पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी रवि शंकर पाटील यांना क्रिप्टोबिझ एक्स्चेंज या एक्सचेंजवर स्टेकींग प्रोग्रामध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याचे अमिष दाखवुन त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानुसार तक्रारदार यांनी केलेल्या गंतुवणुकीतून सुरवातीला नफा मिळत होता. परंतु कालांतराने आरोपी यांनी तक्रारदार यांना नफा दिला नाही. त्यामुळे त्यांनी वारंवार सदर अर्जातील आरोपींना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचेशी संपर्क झाला नसल्याने अर्जदार यांची खात्री झाली की त्यांची फसवणुक झाली आहे. त्याकरिता अर्जदार यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे तक्रार दिल्याने यातील आरोपी राहुल विजयभाई राठोड व इतर यांचे विरूध्द सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२३ भारतीय दंडविधान संहिता कलम ४०६, ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार यांच्यासह एकूण २,९३,६६,८४२/- इतक्या रकमेची आरोपींनी फसवणुक केली असल्याचे अद्याप पावेतो झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी त्यांच्या स्किमचा प्रसार करणेकरिता व फसवणुक करण्याकरिता वेगवेगळ्या डिजीटल साधनांचा व www.cryptobiz.exchange याचा व cryptobiz या मोबाईल अॅप्लीकेशनचा वापर केला असल्याने त्याद्वारे आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून दाखल गुन्हयातील आरोपी नामे राहुल विजयभाई राठोड (क्रिप्टोबीज या कंपनीचे मालक) वय – ३५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३००४, टॉवर नं. १८, ब्ल्यूरिच सोसायटी, हिंजवडी, फेज-१, पुणे व त्याचा मुख्य साथीदार ओमकार दिपक सोनवणे, वय-२५ वर्षे, रा. एफ-७०२, एलिना लिव्हींग, एन. आय.बी.एम. रोड, कोंढवा, पुणे यांना दि. १३/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली असून अटक आरोपी यांना मा.. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. १८/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. अटक आरोपी यांचेकडून ०२ दुचाकी, ०१ चारचाकी वाहन, लपटॉप, मोबाईल फोन, इंटरनेट मोडेम, पेनड्राईव्ह इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडून आव्हान करण्यात येते की, cryptobiz.exchange याचा वापर करून आरोपी नामे राहुल विजयभाई राठोड व ओमकार दिपक सोनवणे यांनी गुंतवणकीतून आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून फसवणुक केली असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आवार, परडे ग्राऊंड जवळ, शिवाजीनगर, पुणे या कार्यालयाशी संपर्क करावा.
सदरची कामगिरी मा. श्री. रितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. श्री. श्रीनिवास घाडगे सो, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. विजयकुमार पळसुले सोग, सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती. मिनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सूचनेनुसार पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकरी श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस उप निरीक्षक श्री. तुषार भोसले, श्री. सचिन जाधव, श्री. संदीप कदम व पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, संतोष जाधव, नवनाथ कोंडे, प्रवीण राजपुत, बापु लोणकर, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, बाबासाहेब कराळे, पुजा मांदळे, सोनाली चव्हाण, सुनयना मोरे यांचे पथकाने केली आहे.