डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता.१७:- पिंपरी चिंचवड शहरात सध्या रस्त्यावर नो पार्किंग, फुटपाथ पार्किंग, केलेल्या वाहनांवर टोइंग च्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. एखाद्या दुकानासमोर अथवा नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभे करून चार पाऊल पुढे गेले की, पाठीमागे पार्किंग केलेले वाहन गायब! वाहन दृष्टीस पडले नाही तर …..जीव अगदी कासावीस होऊन जातो कोणी भामट्या चोराने आपले वाहन चोरून नेले नाही ना? असा प्रश्न पडतो आणि नुसत्या विचाराने दरदरून घाम फुटु लागतो. तेवढ्यात कोणीतरी सांगते की तुमचे वाहन वाहतूक पोलिसांनी टोइंग करून अमुक अमुक ठिकाणी लिहिले आहे. दंड भरा आणि वाहन सोडवुन आणा. मग धावपळ सुरू होते.
वाहतूक पोलीस आणि टोईंग कर्मचारी यांची तत्परता अगदी वाखाणण्याजोगी आहे. मात्र, कारवाईच्या नावाखाली हे टोईंग कर्मचारी सध्या शहरातील नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. टोईंग करून आणलेले वाहनांची संख्या अधिक असते आणि दंड म्हणून आकारलेल्या पावत्यांची संख्या मात्र मोजकी असते .नियम धाब्यावर बसून ही मंडळी राजरोसपणे चालकांची लूट करीत आहेत. एका दिवसाला एका वाहतूक भागामध्ये जवळपास १०० ते १५० गाड्या टोईंग करून आणल्या जातात .मोजक्या वाहनांवर कायदेशीर पावती आकारल्यानंतर इतर वाहनांबाबत काय निर्णय घेतला जातो. हा संशोधनाचा भाग आहे. याबाबत उपस्थित वाहतूक पोलिसाकडे विचारणे केले असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस अधिकारी या विषयावर न बोलणे पसंत करतात.
निगडी ,वाकड, हिंजवडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, तळवडे ,या विभागात गाड्यावर काम करणारे खाजगी मजूर कर्मचारी नागरिकांकडे थेट पैशाची मागणी करीत असल्याची चर्चा आहे. वाहन चालकांसोबत मांडवली करून रोख रक्कम स्वीकारली जात असल्याची माहिती देखील मिळत आहे .तर अनेक ठिकाणी गुगल पे, फोन पे चा वापर करून रक्कम स्वीकारली जात असल्याची धक्कादायक बाब चर्चाचा विषय बनली आहे. टोईंग गाडीवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने असे प्रकार सगळाच पाहायला मिळतात.
आपलेवाहन टोइंग करून उचलल्यानंतर नेमकं किती दंड भरला पाहिजे. याबाबत सविस्तर चारट टोईंग गाडीवर लेखी स्वरूपात नमूद केलेला आहे. वाहन टोईंग केल्यानंतर रु.२३६वआणि नो पार्किंग रु ५०० असा एकुण ७३६ रुपये दंड नियमाप्रमाणे आकारला जातो. तो चालकाने भरावा. मात्र , टोईंग वाहनांवरील खाजगी कर्मचारी व ट्रॅफिक वाहनावरील कायदेशीर दंड आकारणी करण्याचे सोडून नुसत्या चौकशी चालकावर ससेमिरा सुरू करतात वाहन चालकांकडे लायसन्स, पीयूसी इन्शुरन्स, आरसी कार्ड, आरसा हेल्मेट, अगदी कागदपत्राची मागणी करून लायसन्स नसले तर ५०००रु. इन्शुरन्स नसेल तर २०००,आरसा नसेल तर ५०० दंडाची रक्कम सांगून चालताना भीती दाखवतात.
यावेळी थोड्यावेळाने तेथील एक व्यक्ती(दलाल) मध्यस्ती मांडवली करून सेटलमेंट करतो. अनेक प्रकरण मिटवून घेतली जाते. हे सर्व तिथे उपस्थित वाहतूक पोलिसांच्या संमतीने सुरू असते का? असा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे. असे गैरप्रकार पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या कानावर केल्या असून ते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.