अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी.
मो नं.-९८२२७२४१३६
सावनेर :- पत्रकार हा लोकशाहीचा पाया रचणारा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. पण आज पत्रकारांना स्वतंत्र अशी जागा नाही त्यामुळे सावनेर येथे पत्रकार भवनाची गरज भासत आहे. त्यामुळे सावनेर येथील उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या “पत्रकार भवन” निर्माण करण्यासाठी भुखंडाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवेदनावर साकारात्मत विचार करुण शासनाच्या सर्व निकषाचे विचार करुण भूखंड उपलब्ध करुण देण्याबाबत नक्कीच विचार करण्याचे आश्वासीत केले. सोबतच सावनेर तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, मुख्याधिकारी हर्षला राणे, पंचायत समिती बीडीओ दिपक गरुड, पोलीस निरिक्षक मारुती मुळुक, भुमी अभीलेख कार्यालय सावनेर, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता सालोडकर इत्यादींना नवनियुक्त सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी तसेच सदस्य पत्रकारांची माहिती निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, सचिव लक्ष्मीकांत दिवटे, कार्याध्यक्ष दिपक कटारे, उपाध्यक्ष अनंता पडाळ, जिल्हा प्रतिनिधी विजय पांडे, कार्यकारणी सदस्य विनोद गुप्ता, विनोद वासाडे, प्रशांत सांभारे, प्रा.विजय टेकाडे, पुरुषोत्तम नागपुरकर, मधुकर रोकडे, अनिल अडकिने, शांताराम ढोके, पीयूष झिंजुवाडीया, मुकेश झरबडे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.