Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

राजकीय व व्यवसायिक क्षेत्रातील व्यक्तींना खंडणी मागणारा आरोपी जेरबंद व्हॉटसअॅप मॅरेज ग्रुपचा गैरवापर करुन तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तींची व तिची बदनामी व्हावी व त्रास व्हावा या उद्देशाने त्यांच्या नावाचा वापर केल्याचे निष्पन्न

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राजकीय व व्यवसायिक क्षेत्रातील व्यक्तींना खंडणी मागणारा आरोपी जेरबंद व्हॉटसअॅप मॅरेज ग्रुपचा गैरवापर करुन तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तींची व तिची बदनामी व्हावी व त्रास व्हावा या उद्देशाने त्यांच्या नावाचा वापर केल्याचे निष्पन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे मॅरेज ब्युरो ग्रुप सन २०२० पासुन सुरु असुन ग्रुपचा अॅडमीन इम्रान समीर शेख वय- रा. घोरपडीगाव पुणे हा होता. सन २०२० मध्ये इनोवा कार क्र. एम.एच. १२ क्यु आर ७८६० या गाडीच्या मालकाची पुतणीचा बायोडाटा तिच्या आईने सदर ग्रुपमध्ये टाकला होता. ग्रुप अॅडमीन इम्रान शेख (आरोपी) ३७ वर्षे, याने सदर मुलीसाठी शाहनवाज गाझीयाखान (आरोपी) याचे स्थळ सुचविले होते. परंतु तरुणीच्या घराच्या लोकांनी शाहनवाज याचे स्थळ नाकारले. त्यानंतर ग्रुप अॅडमीन इम्रान शेख याने बनावट नावाने तरुणीच्या आईशी व्हॉटस अॅप द्वारे चॅटींग करुन सदर तरुणीचे लग्न स्वतःशी लावुन देण्याची मागणी केली. त्यानंतर सदर तरुणी घटस्फोटीत असल्याचा बनवाट बायोडाटा बनवुन तो ग्रुप मध्ये पाठवुन इग्रान शेख याने तरुणीची बदनामी केली. त्यामुळे सदर तरुणीने चंदननगर पोलीस स्टेशन येथे दि. २७/०३/२०२२ रोजी गु. रजि. नं. ९८/२०२२ भा.द.वि. कलम ५०९, ५०४, ५०६, ५०४, ५०० अन्वये गुन्हा दाखल केला होता..

त्यानंतर आरोपी इम्रान शेख याने त्याचा व सदर तरुणीचा फोटो वापरून बनावट गॅरेज सर्टीफिकेट बनवुन ते मॅरेज सर्टीफिकेट सर्व ग्रुपवर व्हायरल केले. म्हणुन सदर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन चंदननगर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. २६९/२०२२ भा.द.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,५००, ३४ अन्वये इम्रान शेख व शेख जलील शेख खलील यांचे विरुद्ध दि. २४/०७/२०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये वरील आरोपीस अटक करण्यात आली होती…

दि. २३/०९/२०२२ रोजी माजी नगरसेवक दिपक धोंडीबा मिसाळ यांना वेगवेगळ्या व्हॉटसअॅप क्रमांकावरुन धमकी देवून पैशांची मागणी करण्यात आलेली होती. त्याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुरजि.नं. १७९/ २०२२ भा.द.वि. कलम ३८६. माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) अन्वये दि.. २४/०९/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा इम्रान शेख याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली होती.त्यानंतर सदर तरुणीचा फोटोचा वापर करुन तिचे नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन तरुणीचे अश्लिल फोटो मॉर्फ करुन ते प्रसारीत केले होते. त्यामुळे सदर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन चंदननगर पोलीस स्टेशन गुरजि. नं. ३५२ / २०२२ भा.द.वि. कलम ५०००, ५०० माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६५ अन्वये दि. २९/०९/२०२२ रोजी इम्रान शेख याचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आरोपी इम्रान शेख याला अटक करण्यात आलेली होती…त्यानंतर मा. नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश वसंत मोरे याचे व्हॉटसअॅपवर अनोळखी मोबाईल नंबर वरून मेसेज करून बनावट मॅरेज सर्टीफिकेट तयार करून ते व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची वारंवार धमकी देवून ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करून खंडणीची रक्कम ही ईयॉन आयटी पार्क खराडी पुणे येथे समोर एक इनोव्हा गाडी क्र. एम. एच. १२ क्यु. आर. ७८६० या मध्ये ठेवण्याबाबत सांगितले होते. सदरची खंडणीची रक्कम न दिल्यास रेप केस टाकण्याची धमकी दिली होती. त्याअनुषंगाने फिर्यादी रुपेश वसंत मोरे याचे फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुरजि. नं. १५५/२०२३ भा. द. वि. कलम ३८७,५०६३४ माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अन्वये दि. ०६/०३/२०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पुणे शहरातील नामांकित व्यावसायिक अनुज गोयल यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे मेसेजेस करुन गुलाला किडनॅप करून जीवे ठार मारण्याची धमकी देवुन ३० लाख रुपयांची मागणी करून सदरची खंडणीची रक्कम ही ईवॉन आयटी पार्क खराडी पुणे येथे समोर एक इनोव्हा गाडी क्र. एम.एच. १२ क्यु. आर. ७८६० या मध्ये ठेवण्याबाबत सांगितले होते. त्यावरून फिर्यादी अनुज गोयल यांनी फिर्याद दिल्याने बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरजि. नं. ७७ / २०२३ भा.द.वि. कलम ३८७,५०६, ५०७,३४ माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये दि. ०७/०३/२०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्याप्रमाणेच मा. नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांना व्हॉटसअॅपवर मेसेज करुन गोळ्या घालुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन सदरची रक्कम न दिल्यास राजकीय कारकिर्द नष्ट करण्याची धमकी दिली. खंडणीची ३० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये हे ईवॉन आयटी पार्क खराडी पुणे येथे समोर एक इनोव्हा गाडी क्र एम. एच. १२ क्यु. आर. ७८६० या मध्ये ठेवण्यास सांगुन १० लाख रुपये सिल्लोड येथील स्टेट बैंक ऑफ इंडीयाचे अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले होते. फिर्यादी अविनाश रमेश बागवे यांनी समर्थ पोलीस स्टेशन गुरजि.नं. ८७ / २०२३ भा.द.वि.लम ३८७,५०७ माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये दि. ०४/०४/२०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता…. त्याप्रमाणेच भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे परिवर्तन हेल्पलाईन मोबाईल
क्रमांकावर मेसेज पाठवुन ३० लाख रुपयांची मागणी केली रक्कम न दिल्यास त्यांना डोक्यात गोळी घालुन मृत्यु घडवुन आणण्याची भिती घातली म्हणुन आमदार महेश लांडगे यांचे परिवर्तन हेल्पलाईन प्रतिनिधी म्हणुन काम करणारा यश गणेश पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी पोलीस स्टेशन गु. रजि.नं.
३१७/२०२३ भा.द.वि. कलम ३८७, ५०७ अन्वये दि. ०५/०४/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

वरील सर्व गुन्ह्यांची कार्यपध्दत पाहता मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करणे बाबत पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा पुणे यांना आदेशीत केले होते. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे देखरेखी खाली गुन्हे शाखेची ५ वेगवेगळी पथके तयार केली होती..आरोपी शाहनवाज गाझीयखान व इम्रान शेख हे पुणे मॅरेज ब्युरो ग्रुप मध्ये अॅडमीन व सदस्य असुन त्यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा गैरवापर करून गुन्हा केल्याचे निष्पन्न होत असून तपासा दरम्यान आरोपीत याने तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तींची व तिची बदनामी करण्याच्या व त्रास देण्याचे उद्देशाने वरील सर्व गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.

नमुद गुन्ह्यात वापरलेले व्हॉटसअॅप अकाऊंट, मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक विश्लेषण करता सदरचा गुन्हा हा विविध व्हॉटसअॅप अकाऊंट हॅक करून त्याद्वारे फिर्यादींना खंडणीसाठीचे मेसेजेस पाठवून तसेच चंदननगर पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल करणा-या तरुणी व तिच्या कुटुबीयांच्या नावाने त्यांचे वाहनाचा क्रमांक व पत्ता देवुन खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी शाहनवाज गाझीयखान वय ३१ वर्षे, रा. २६९, मका मस्जिदजवळ गुरुवार पेठ, पुणे, सध्या फझाने मस्जिद समोर, कोंढवा बु. पुणे हा वेगवेगळ्या व्हॉटसअॅप मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये सामील असुन त्याने स्वताच्या व्हॉटसअॅपला महीलेचा फोटो डीपी लावुन मॅरेज ग्रुप मधील लोकांशी व्हॉटसअॅप चॅटींग करीत असताना स्वतः महीला असल्याचे भासवुन त्यांच्याशी जवळीक साधुन त्यांचे व्हॉटसअॅपचा ओटीपी मागुन घेवुन त्यांचे व्हॉटसअॅप हॅक करून त्या व्हॉटसअॅप अकाऊंट द्वारे विविध राजकीय व व्यावसायिक व्यक्तींना खंडणीच्या मागणीचे मेसेजेस करत होता. तसेच व्हॉटसअॅप मॅरेज ब्युरो ग्रुप मधील सदस्यांना सुध्दा फिर्यादींचे मोबाईल क्रमांक देवुन त्यांची दिशाभुल करुन त्यांना वेगवेगळे मेसेज पाठविण्यास भाग पाडत होता. तसेच सिल्लोड, औरंगाबाद येथील व्यक्तीबरोबर स्वतः मुलगी असल्याचे भासवुन व्हॉटसअॅप द्वारे मेसेज करुन आपले पार्सल घेण्यास सांगुन सदर पार्सलचे पैसे देण्याच्या बहान्याने अकाउंट क्रमांक घेवुन तो खंडणीतील फिर्यादींना खंडणी मागण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झालेले आहे. नमुद गुन्ह्यातील अटक आरोपी शाहनवाज गाझीयखान याचे ताब्यातुन गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल, सिमकार्डस, तसेच त्याचे मोबाईल मध्ये फिर्यादीचे मोबाईल क्रमांक, फिर्यादीची माहीती, तसेच फिर्यादींना धमकाविण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक व्हॉटसअॅप क्रमांक आरोपीच्या मोबाईल मध्ये मिळुन आले आहेत. तसेच विविध राजकीय प्रसिध्द व्यक्तींची फोटो, माहीतीचे स्क्रिनशॉट, वेगवेगळे मॅरेज सर्टिफिकेटस तसेच हॅकींग केलेले व्हॉटसअॅप क्रमांकाचे ओटीपी स्क्रीन शॉटस मिळुन आले आहेत. तसेच आणखीन ४ राजकीय व व्यवसायिक क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तीकडे. खंडणी मागण्याच्या तयारीत असल्याचे पुरावे प्राप्त झाले असुन त्याने त्याबाबतची कबुली दिली आहे..

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल शेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अजय जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, विनोद साळुंके, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेगडे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, मारोती नलवाड, सागर घोरपडे, अभिनव लडकत, अनिकेत बाबर, अय्याज दड्डीकर, दरेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

मुकुंद संग पल्लवी यांच्या विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थिती, नव वधू वरास दिले शुभ आशीर्वाद

Next Post

कळव्या मध्ये वाढते अवैध अतिक्रमण, ठाणे मनपा प्रशासन जर इतकी निष्काळजीपणाने काम करीत असेल तर मग ठाण्याला अतिक्रमण विभागाची गरज काय? आ. जितेंद्र आव्हाड

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कळव्या मध्ये वाढते अवैध अतिक्रमण, ठाणे मनपा प्रशासन जर इतकी निष्काळजीपणाने काम करीत असेल तर मग ठाण्याला अतिक्रमण विभागाची गरज काय? आ. जितेंद्र आव्हाड

कळव्या मध्ये वाढते अवैध अतिक्रमण, ठाणे मनपा प्रशासन जर इतकी निष्काळजीपणाने काम करीत असेल तर मग ठाण्याला अतिक्रमण विभागाची गरज काय? आ. जितेंद्र आव्हाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In