नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणाचा अनेक वेळा समोर आला आहे. पण प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे जमीन तस्कर मालामाल झाले आहे. त्यात आता कळव्या मधून अशीच एक माहिती समोर येत आहे. या विरोधात राज्याचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महानगर पालिका प्रशासनावर मोठें प्रश्न निर्माण केले आहे.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, कळव्यामधील मफतलाल कंपनी ही काही वर्षांपूर्वी बंद झाली होती. मफतलाल कंपनीची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी मा. न्यायालयाने बाऊंड्री आखून दिलेली असताना देखिल तेथिल अर्धाअधिक भाग हा झोपडपट्टी वासीयांनी व्यापला आहे. पण, उर्वरीत भाग सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून मा. न्यायालयाने कंपाऊंड टाकायला सांगितले होते. पण, आतामात्र हिंमत इतकी वाढली आहे की, एक महिला व पुरुष नामे स्वाती पाटील व कंचन सिंग यांनी हे कंपाऊंड तोडून त्या ठिकाणी 500 अनधिकृत झोपड्या बांधण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांना अडवायला देखिल कोणी नाही. वॉचमन गेला तर ते अंगावर येतात. म्हणजे जंगलराजचे स्वरुप त्या जागेला प्राप्त झाले आहे. असे यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मी स्वत: ही बाब ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. थोरात यांच्या देखिल कानावर टाकली आहे याला वेळीच आवर घातला नाही, तर त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेची असेल.
ठाणे महानगरपालिका प्रशासन जर इतकी निष्काळजीपणाने काम करीत असेल तर मग ठाण्याला अतिक्रमण विभागाची गरजच काय ? सगळीकडे अनधिकृत बांधकामे चालू आहेत. झोपडपट्टीदादा जमिनी बळकावत आहेत आणि महापालिकेचे स्थानिक सहाय्यक आयुक्त हे पैसे खाण्यात मग्न आहेत. ही परिस्थिती फार दुर्देवी आहे. याकडे वेळीच लक्ष द्या. अन्यथा आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल.
आपल्या परिसरातील बातम्या करीता संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/ 7385445348

