महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
तामिळनाडू:- भारतात सर्विकडे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक मनुष्याने भारतीय तिरंगा ध्वजा प्रती अभिमान बागळून घरोघरी तिरंगा फडकला. तर दुसरीकडे एका सरकारी शाळेतील महिला मुख्याध्यापिकेने स्वातंत्र्यदिनी वादग्रस्त भूमिकेमुळे घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी जिल्ह्यामध्ये असलेल्या तमिळसेल्वी नाव असलेल्या सरकारी शाळेतील मुख्याध्यापिका असणाऱ्या शिक्षिकेनं राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात चक्क नकार दिला. संतापजनक बाब म्हणजे आपण ख्रिश्चन धर्मीय असल्यानं राष्ट्रध्वजाला सलामी देणार नाही, असं म्हटल्यानं. हा प्रकार स्वात्रंत दिनाच्या दिवशी शाळेतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी घडला.
या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमा दरम्यानतच तमिळसेल्वी यांनी राष्ट्रध्वजाबाबत घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्याध्यापकांनी ध्वजारोहणास नकार दिल्यामुळे शाळेतील सहाय्यक मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी अखेर भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण केलं.
याबातीतील शिक्षिका काय म्हणाली?
सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ध्वजारोहणा बाबत घेतलेली भूमिकेमुळे सर्विकडे संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे या शिक्षिकेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असं या शिक्षिकेनं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पण, मी याकोबा ख्रिश्चन असून आमच्यात फक्त देवालाच सलाम करण्याची पद्धत आहे. म्हणून मी इतर कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करायला सांगितलं, असं तमिळसेल्वी या शिक्षिकेनं म्हटलंय.