श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन अंबाजोगाई:- येथे आय.पी.एल च्या धर्तीवर एम.पी.एल क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्धघाटन जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते नंदकिशोरजी मुंदडा यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी सुनिलकाका लोमटे व बीड जिल्हा माहेश्वरी समाज अध्यक्ष अॕड. श्रीकृष्ण तोष्णीवाल होते तर विशेष अतिथी म्हणून जगदिश जाजु, रामनिवास भन्साळी, दत्तप्रसाद लोहिया, सतिश तोष्णीवाल, रोहन मुंदडा, नितीश लोहिया हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वैजनाथ देशमुख निशिकांत पाचेगावकर, संदीप पारीख, श्रीकांत मुंदडा, सुरज बजाज, शुभम लखेरा, अभिमन्यु वैष्णव व संजय सुराणा उपस्थित होते.
माहेश्वरी प्रीमीअर लीग 21, 22 23 एप्रिल रोजी होत आहे. या मध्ये TVS पँथर्स, मुंदडा किंगज, केकीज इंडीयन, लखेरा वाॕरीअर्स, वैष्णव सनरायजर्स, सुराणा सुपरकींग हे सहा संघ खेळत आहेत. माहेश्वरी युवा संघटना कडुन एमपीएल चे हे 11 वे वर्ष आसुन यामुळे राजस्थानी समाजाचे 90 खेळाडु मैदानावर उतरले आहेत. हि क्रिकेट स्पर्धा नवयुवकासाठी नक्कीच प्रेरणादाई आहै.
यावेळी या एमपीएल क्रिकेट लीग च्या उद्धघाटन समारंभाची सुरवात भगवान महेशाचे पुजनाने झाली. उद्धघाटन समारंभाचे संचालन अशोक तापडे यानी केले. सामन्याचे पंच म्हणुन अमोल गोचडे व धम्मा जाधव म्हणुन काम पहात आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवा माहेश्वरी आंबाजोगाई यांनी परीश्रम केले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.