सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हा तील बल्लारपूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची हातपाय बांधून गळा चिरून निर्मम हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येतात या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल दासरवार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बल्लारपूर शहरातील न्यू कॉलनी रोड महाराणा प्रताप वॉर्ड दुर्गा माता मंदीरजवळ शामराव कोडूरवार यांच्या मृत्यूनंतर घराच्या प्रॉपर्टीकरिता नेहमी वाद होत असे. शामरावला मुलगा नसून तीन मुली आहेत. त्यात दुसऱ्या नंबरचा जावई विशाल दासरवार नेहमी सासू सोबत वाद घालायचा. अशातच शनिवारी 22 एप्रिल रोजी पहाटेला विशाल दासरवारची गळा चिरून निर्मम हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.
घराचा प्रॉपर्टीकरिता विशाल नेहमी दारू पिऊन सासूसोबत वाद घालत होता. विशालची पत्नीसुद्धा आपल्या पतीसोबत मिळून आईशी भांडण व मारहाण मारपीट करीत होते. पोलीस ठाण्यात दोन्हीकडून गुन्हे दाखल झाले आहे. अशातच विशालची खाटेवरच हातपाय बांधून गळा कापून हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात अनेक चर्चेला वाव फुटले आहे.
याची माहिती बल्लारपूर पोलिसाना प्राप्त होतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी रुग्णालयात पाठवले आहे. आरोपीचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहे.

