राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगाव येतील रहवासी गजानन ठाकूर हे आष्टी पोलीस स्टेशन येथे आपले पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई गजानन ठाकूर यांचे अपघाती दुःखद निधन झाले होते त्यांना आज जाऊन पुर्ण तीन वर्ष झाले. त्यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण निमित्त आज हनुमान मंदिर डोंगरगाव येथे सर्व मित्र परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजलि वाहण्यात आली.
पोलीस शिपाई या पदावर असताना त्यांनी अनेक प्रकरणात उत्तम कामगिरी बजावली. गजानन ठाकूर हे अतिशय प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या मित्र परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला होता. गजानन ठाकूर यांचा पच्छात आई, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.