विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लाखांदूर:- भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दोनाड मध्ये व इतर काही ठिकाणी सर्वत्र खुलेआमपणे अवैद्य धंदे सुरू असून प्रशासनाचे याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे दोनाड गावात मटका, हातभट्टी दारू ,जुगार, खुलेआमपणे मावा गुटका दोनाड मध्ये विकण्यात येत असल्याचे दिसत असून देखील अवैद्य धंदे खुले आमपणे जुगार चालू असूनही प्रशासन हे अवैद्य प्रकरारावर कारवाई करताना दिसून येत नाही यामुळे प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. मग या अवैध धंदा व्यवसायिका वर कारवाई करणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत.
रेती तस्करी आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत.
लाखांदूर तालुक्यातील नांदेड, दोनाड, खौरना, मोहरणा, गवराळा, टेंबरी या गावात दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून तस्करी सुरू आहे. अवैध रेती तस्करामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असला तरी प्रशासकीय कर्मचारी लोकाच्या हे कस लक्षात येत नाही?
लाखांदूर तालुक्यात दोनाड सह अनेक गावे विकासापासून दूर आहे. त्यामुळे या गावात दारिद्र रेषेखालील जिवन जगत असलेल्या लोकांना पोटाची खडगी भरून पोट भरणे मुश्किल असताना सुद्धा गावात दारू, जुवा, सट्टा असा विविध प्रकारच्या धंदे सर्रास पने सुरू आहे. या सर्वामध्ये तरुण पिढी व्यसनाधिन बनत आहे. यामुळे अनेक तरुनाचे आयुष्य बर्बाद झाले आहे.
मटका, हातभट्टी दारू, जुगार गुटका मावा यावर अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासनाला अक्षरशः अपयश आले परिस्थिती दिसून येत आहे. असे सर्व सुरू असताना कारवाईचा बडगा उचलला जात नाही. कारण रेती तस्कर आणि अवैध धंदे वाले सरळ सरळ बोलतात कोणीही आमचं काही करू शकत नाही त्यामुळे अवैध धंद्या वाल्यांवर महसूल आणि पोलिस प्रशासनाचा कसलाही धाक नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळेच दोनाड गावासह अनेक गावात रात्र – दिवसभर सर्व प्रकारच्या अवैध धंदे खुले आमपणे सुरू असल्याचे दिसत आहे. चोरटी रेती उत्खनन, दारू, जुगार, मटका याचा नुसता नंगा नाच सुरू असून यातून कधी कुणाचा बळी जाईल हे सांगता येणार नाही हे ही तितकेच खरे आहे. गावात चौका चौकात मटका गुटखा मावा तर पान टपरीवर पिशवीतून विकला जात असून कोणाचेही भय नाही अशा गत झाली आहे. या खेडेगावातील जे सामान्य नागरिकांना जे दिसते ते पोलिसांना व प्रशासनाला का दिसु नये? पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन वेळीच आवर घालने गरजेचे आहे. अशा अवैध धंद्यांना वेळीच लगाम घालून कठोर कारवाई करणार का? हे पाहणे उचित ठरेल. नाहीतर विनाकारण आणखी काही माता-बहिणीच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याची वेळ येईल हे तितकच कटू सत्य आहे.