आसिफ शेख, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- १८ ऑगस्टला महाराष्ट्रासह देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होणार आहे. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. तिथीनुसार कृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी रात्री १२ वाजता जन्माष्टमीचा उत्सव सुरु होतो. दिवसभर व्रत करून रात्री १२ वाजता लड्डू गोपाळाला नैवेद्य दाखवून मग अन्न ग्रहण केले जाते. अनेक घरांमध्ये यादिवशी जागरण व भजनसंध्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा तुमच्याकडेही असा सोहळा आयोजित करणार असाल तर या प्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी आपण काही मंगलमय भजने, धम्माल गवळणी व मराठी गाणी आज पाहणार आहोत.
भारतीय जनता पक्षातर्फे टी-शर्ट वाटप कार्यक्रमाचे आयोजन विक्रोळी येते करण्यात आले होते,मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असल्याचे देवेंद्र प्रहार डोके प्रभाग अध्यक्ष 119 भारतीय जनता पार्टी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले, विक्रोळीच्या सर्व विभागांनी येथून टी-शर्ट मोफत घेतले. गणेश मार्ग भाजपा कार्यालय देवेंद्र डोके यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी ॲड. ज्योती धुराफे, श्रुती घोगले, राजू मालाडकर दिपाली गावडे,अमोल गावडे, नरेंद्र चव्हाण, विनय कुमार शर्मा आणी सर्व भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.