निलेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधी
यवतमाळ:- जिल्हातील वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या शिक्षिकेवर एका 22 वर्षीय माथेफिरू तरुणाने चाकूने वार करून गंभीररीत्या जखमी केले. ही घटना गुरुवारी 18 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या वैशाली चल्लावार वय 40 वर्ष या आपल्या परिवारासह चंद्रपूरला जान येन करतात. त्यामुळे काल वैशाली चल्लावार या आपले कर्तव्य पार पाडून शाळा सुटल्यावर आपल्या गावी चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या नायगाव फाट्यावर बस किंवा अन्य प्रवासी वाहनाची वाट बघत असताना अचानक एका माथेफिरु युवकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्या तर त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे सर्विकडे एकच खळबळ उडाली.
आरोपी राजू अन्सारी वय 22 वर्ष असे नाव सांगत असलेला माथेफिरू याने वैशाली चल्लावार या शिक्षीकेवर हल्ल्यात त्यांचा कानाला जखम झाली आहे. ती जखमी झाल्याचे नागरिकांना कळताच तिला घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्लेखोर माथेफिरु युवक स्वतःचे नाव राजू अन्सारी सांगत आहेत. त्याच्याजवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याने चाकू हल्ला का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रामेश्वर कंदुरे पुढील तपास करत आहे.