महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला प्रतीनिधी:– नुकताच सन्मित्र संघटना अकोला तसेच केळकर हॉस्पिटलचा ४० वा वर्धापनदिना निमित्त भव्य व्यसनमुक्ती शिबिर व सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांचा अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. दिपक केळकर, माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, रमाकांत खेतान, सुनंदा केळकर व शहरातील तसेच जिल्ह्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे हे मागील अनेक वर्षापासून रुग्णसेवेचे कार्य करत आहे. त्यांनी अनेक रुग्णाला चांगला उपचार मिळावा म्हणून मदत केली. शहरातील विविध प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न. सोडविले. वेळ प्रसंगी आंदोलनाची भूमिका पण घेतली. अशा रुग्णसेवकाचा सत्कार करण्यात आलेल्या अनेक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

