ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील पाचोरा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी पाचोरा शहरातील व तालुक्यातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून याकरिता भव्य दिव्य असे स्टेज उभारले असून साधारण स्टेजवर साधारणता शंभर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तीस ते पस्तीस हजार बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था केली आहे तसेच मान्यवरांकरता स्वतंत्र्य व्यवस्था केली असून पत्रकार मंडळी महिला वर्ग यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही सभा भूतो ना भविष्य अशी होणार असे सांगण्यात येत असून या सभेचे पडसाद पुढील सर्व निवडणुकीत पडतील ही सभा होणार आहे या सभेसाठी पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते नियोजन केलेले असून शिस्त पद्धतीने सभा होईल यासाठी पोलीस प्रशासना तर्फे ग्राउंड वरील सर्व बारीक सारिक गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले असून खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज आहे. या सभेचे नियोजन पाचोरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सौ वैशाली सूर्यवंशी, संजयजी सावंत, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख श्री सुनील पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, पाचोरा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, हर्षल माने, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेशजी बाफना, अरुण पाटील, उद्धव मराठे, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, अँड. दीपक पाटील, अनिल सावंत, दत्तात्रय जडे, दादाभाऊ चौधरी संदीप जैन, जितेंद्र जैन, अभिषेक खंडेलवाल, भूपेश सोमवंशी, पप्पू जाधव, हरीश देवरे, प्रशांत सोनार, संजय चौधरी तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते स्टेजची पाहणी करताना उपस्थित होते.