मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- शहरातील शुभम पुज्जलवार, नागेश वाकुडकर, भूमय्या संगमवार, यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या सर्वांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांना धीर दिला!
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यावेळी बोलताना म्हणाले की, मी आपल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी समजू शकतो या घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर यांच्या आत्माला शांती देओ. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!