मंगेश सावरकर मध्य नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन नागपूर:- नागपुर येथे नागरिकांना राशन मध्ये मिळणारे स्वस्त धान्याच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यात अनेक भागात विविध राशन तस्कर नागरिकाच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारून ते धान्य खुल्या बाजारात विक्री करून लाखोंची माया जमा केली आहे. अशाच एका धान्य तस्क्राचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्पर्दाफास केला आहे. त्यामुळे राशन धान्याचा काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे समोर आले आहे. नागपुर येथील खालसी लाईन गडी गोदाम मध्ये अवैध गोदमात राशनचे स्वस्त धान्याचा साठा युवा सेनाचे (ठाकरे गट) शरद सरोदे व पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी भांडाफोड केला
युवा सेना अन्न नागरी पुरवठा विभागाच्या साहाय्याने राशनचे स्वस्त धान्याने भरलेला ट्रकचा युवा सेना (ठाकरे गट) कार्यकर्तानी पाठलाग करुन काळाबाजार होत असल्याचे उघडीस आणले. कार्यकताच्या आक्रमक प्रयत्नाने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धागे दणावले. यां आधी युवा सेनाचे जिल्हा प्रमुख शरद सरोदे यांनी पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांना निवेदन देऊन या काळाबाजर बद्दल आवाज उचलला होता व तो काळाबाजार थांबवण्यासाठी युवा सेनाच्या पद अधिकारी यांनी विभागीय पुरवठा अधिकारी यांना घेऊन स्पॉट वर जाऊन धाड टाकून मोठ्या प्रमाणात राशनचा स्वस्त धान्याचा माल पकडला. व पुरवठा विभागा चे अधिकारी डी. एस. दिवटे व आर.जे सुर्वे यांनी घटना स्थळी गोदामाच्या पंचनामा करुन सील करण्याचे आदेश दिले.
यामध्ये जे काळाबाजारी करत होते त्यांची नावे श्याम किराणा स्टोअर, जे. एन. जैन ग्राम सहकारी संस्था, गांधी नगर सोसायटी, जगदीश ग्राहक सहकारी संस्था, प्रकाश किराणा यां काळा बाजार करण्यामध्ये समावेश आहे. गरीब जनतेचे धान्य दिवसा ढवळ्या लुटण्यात येत आहे. यां करणास काळाबाजारास अधिकारी करणीभूत आहे. असे युवा सेना (ठाकरे गट) चे आरोप आहे. यावेळी युवा सेनेचे कार्यकत्याची उपस्थिती होती. त्यामध्ये मुल्ला सिंग, सोनू सिंग, छोटू राऊत, बाल्या माहुले, सुखलाल मरोडे, नितु गौर, ठाकूर यांच्या सहभाग होता.