डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता.२६:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पिंपरी पोलीस स्टेशन येथे सुसज्ज असे महिला कक्ष आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत .पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवार (ता.२५)रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या कक्षाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ .संजय शिंदे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे,पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, के एस बी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजीव जैन, कंपनी हेड शिरीष कुलकर्णी, शांतता कमिटीच्या महिला सदस्य दिपाली देशमुख, कविता खराडे, अमृता वैद्य, यांच्यासह केएसबी कंपनी अधिकारी स्टाफ, पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अमलदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की केएसबी कंपनी लिमिटेड ही मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपून पोलिसांसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. पोलिसांनी देखील कंपनीच्या या योगदानाचे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करावे. केएसबी कंपनी हेड व्यवस्थापक शिरीष कुलकर्णी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन येथे महिलांसाठी बांधून दिलेल्या वास्तू प्रति आम्ही केवळ खारीचा वाटा उचलला आहे. त्या पेक्षा पिंपरी चिंचवड पोलिसांचे काम लाख पटीने मोठे आहे.
पिंपरी पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचारी व बाहेरून येणाऱ्या महिला तक्रारदार यांच्यासाठी स्वच्छतागृह व फीडिंग कक्ष उपलब्ध नसल्याने पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर रावतडे यांनी केएसबी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक राजीव जैन यांच्याकडे याबाबत विनंतीने एक प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये पिंपरी पोलीस स्टेशन कडील महिलांसाठी एक सुसज्ज विश्रांती कक्ष व हिरकणी कक्ष बांधून देण्याबाबत नमूद केले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला केएसबी कंपनीच्या व्यवस्थापकांनी मान्य करून पिंपरी पोलीस स्टेशन येथे महिलांसाठी एक सुसज्ज विश्रांती कक्ष एक प्रशस्त हॉल विश्रांती कक्ष व हिरगण कक्षाची वास्तू बी केली. या सुसज्ज वास्तूचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या हस्ते मंगळवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी केएसबी कंपनी व्यवस्थापक आणि उपस्थित मान्यवर यांच्या प्रति आभार व्यक्त केले
🖌️महाराष्ट्र संदेश न्यूज🖌️