✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील अनेक वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने जुगार सुरू होता. या ऑनलाईन जुगारमुळे अनेक नागरिक आपल्या घामाचे पैसे हरल्याचे पण समोर येत होते. अशे ऑनलाईन जुगार चालवणाऱ्यानी अमाप संपत्ती निर्माण केली आहे. तर जुगार खेळणारे हे गरीब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. अशा ऑनलाईन जुगाराच्या अड्डयांवर मोठ्या प्रमाणात तरुण विध्यार्थी पण दिसून येत होते त्यामुळे अशा जुगार अड्डयांवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे हिंगणघाट शहरात एकाच वेळी 6 ऑनलाईन जुगार अड्डयांवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथक व सायबर सेल, वर्धा यांच्याकडून छापे मारण्यात आले. त्यात एकूण 14,32,470 रू. चा मुद्देमाल जप्त करून 29 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील युवा तरुण विद्यार्थी आणि नागरिकांचे भविष्य बर्बाद करणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्डयांवर वर्धा जिल्हाचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्ह्यात चालणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्डयांवर छापे टाकण्याकरीता आदेशी दिले होते. त्यावरून पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक) यांना मुखबीर कडुन खात्रीशीर माहिती प्राप्त झाली कि, वर्धा जिल्ह्या तील हिंगणघाट शहरात 6 दुकानात ऑनलाईन जुगार चालविला जातो. अशी माहिती पोलिस अधीक्षक, वर्धा यांना देऊन त्यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक) व सायबर सेल वर्धा येथील पथकासह हिंगणघाट येथे जावुन वेगवेगळे 6 पथक तयार करून आठवडी बाजार, विर भगतसिंग वार्ड व श्रीराम टॉकीज रोड, हिंगणघाट येथे एकाच वेळी छापे टाकले असता यातील आरोपी हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता 6 दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या जुगाराच्या मशीन लावून तसेच संगणकावर व लॅपटॉपवर इंटरनेटव सॉफ्टवेअरचे माध्यमातून ऑनलाईन जुगार व इतर प्रकारचे जुगार खेळ खेळत व खेळवित असतांना मिळून आले.
त्याठिकाणी घटनास्थळ जप्ती कारवाई केली असता घटनास्थळावरून खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला. त्यात 1) 44 जुगार खेळण्याच्या मशीन अंदाजे किमंत 8,80,000 रू. 2 ) 5 नग कॅम्प्युटर अंदाजे किंमत 1,00,000 रू. 3) 1 नग लॅपटॉप अंदाजे किंमत 30,000 रू. 4) 23 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अंदाजे किंमत 3,19,000 रू. 5 ) 5 नग प्रिंटर मशीन अंदाजे किंमत 50,000 रू. 6) नगदी 31,470 /-रू. 7) इतर साहित्य अंदाजे किंमत 22,000 रू.असा एकुण जु.कि. 14,32,470 रू. चा मुद्देमाल सदर या प्रमाणे जप्त करण्यात आला.
ऑनलाईन जुगार चालवित असलेल्या व खेळणाऱ्या आरोपींचे नावे खालील प्रमाणे. 1) राष्ट्रपाल उद्धवराव भालशंकर, वय 57 वर्ष, रा. विर भगतसिंग वार्ड, हिंगणघाट (जुगार दुकान मालक) 2 ) समीर शेख हफीज शेख, वय 32 वर्ष, रा. विठ्ठल मंदिर वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 3) शेख इम्राम शेख इब्राहिम, वय 25 वर्ष, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 4) प्रफुल राजु हेकने, वय 23 वर्ष, रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 5) शेख मोहसिन शेख रहीम, वय 30 वर्ष, रा. सेंट्रल वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 6) संजय सागर खंडतकर, वय 30 वर्ष, रा. डॉ. भालशंकर यांचे दवाखान्यात, हिंगणघाट (ग्राहक) 7) विक्रांत दौलतराव वावरे, वय 39 वर्ष, रा. विर भगतसिंग वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 8) चेतन मोतीरामजी ढाले, वय 32 वर्ष, संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 9) नंदकुमार धनराज रामटेके, वय 30 वर्ष, रा. पवनी जि. भंडारा, ह.मु. सोनेगाव (राठी), हिंगणघाट 10) शेख राजीक शेख फिरोज, वय 22 वर्ष, रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 11) संदिप पद्माकर सरोदे, वय 48 वर्ष, रा. तहसील वार्ड कचेरी रोड, हिंगणघाट (गाहक) 12) मुमेर इस्राईल खान पठाण, वय 23 वर्ष, रा.निशानपुरा वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 13) निरज शारदाप्रसाद पाराशर, वय 38 वर्ष, रा. रंगारी वार्ड, तिलक चौक, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 14) गजानन रामकृष्ण पर्बत, वय 41 वर्ष, रा. संतकबीर वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 15) रोशन सुरेश निमजे, वय 35 वर्ष, रा. महावीर वार्ड,हिंगणघाट (ग्राहक) 16) सिद्धार्थ वसंता पथोड, वय 42 वर्ष, रा. भिमनगर वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 17) रामा संजय भांडे, वय 21 वर्ष, रा डांगरी वार्ड हिंगणघाट (ग्राहक) 18) लखन बाबाराव कांबळे, वय 27 वर्ष रा. टाका ग्राऊंड झोपडपट्टी, हिंगणघाट (ग्राहक) 19) शेख नसिम शेख शाबुद्दीन, वय 40 वर्ष, रा. जगन्नाथ वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 20) शेख ताहीर शेख ईब्राहीम, वय 25 वर्ष, रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट (ग्राहक) 21) प्रशांत पृथ्वीराज मेश्राम, वय 33 वर्ष, रा. दत्त मंदिर वार्ड, हिंगणघाट (जुगार दुकान मालक) 22) प्रफुल पृथ्वीराज मेश्राम, वय 32 वर्ष, रा. दत्त मंदिर वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 23) दिपक अशोक रामटेके, वय 36 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 24) सागर गणेश बैस, वय 25 वर्ष, रा. विरभगतसिंग वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 25) गुरूदयालसिंग गुरूबच्चनसिंग भादा, वय 25 वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट (जुगार चालविणारा) 26) मंगेश सुरेश गुजर, वय 40 वर्ष, रा. तिळक वार्ड हिंगणघाट (ग्राहक) 27) अविनाश मारोतराव नंदागवळी, वय 26 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट (ग्राहक) 28 ) आशिष पाराशर रा. हिंगणघाट (पाहिजे आरोपी) 29) धिरज पाराशर रा. हिंगणघाट ( पाहिजे आरोपी) वरील सर्व आरोपी हे जुगार मशीनवर तसेच ऑनलाईन पध्दतीचा जुगार खेळ खेळतांना तसेच खेळवितांना मिळुन आल्याने यातील आरोपीतां विरूध्द पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे महाराष्ट्र जुगार अधिनियमचे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपी क्र.1 ते 27 यांना अटक करण्यात आली असुन सदर जुगार दुकानापैकी दोन दुकाने ही यातील आरोपी क्र. 28 व29 हे चालवित असल्याने यातील आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात निरीक्षक कैलास पुंडकर, पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक संदिप कापडे, पोलिस अंमलदार दिनेश बोथकर,विशाल मडावी, रोशन निंबोळकर, अनुप कावळे, सागर भोसले, राकेश इतवारे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, धिरज राठोड, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल वानखेडे व महिला पोलिस अंमलदार स्मिता महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा (विशेष पथक) वर्धा यांनी केली.