युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर दि.26 एप्रिल:- नागपुर जिल्हा त अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात परत एक अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर सावनेर पांढुर्णा मार्गावरील हेठी जवळील चौकात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघात 4 नागरिक जखमी झाले आहे.
काल दुपारी 1.15 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 47 वरील हेटी चौकी परिरसातून एक कार क्रमांक CG04CH9630 ही भरधाव वेगाने नागपूर कडून पांढुरणा राज्य मध्य प्रदेशकडे जात असताना व पांडुरना कडून हैदराबाद कडे जाणारे कंटेनर ट्रक क्रमांक MP09GH3265 हे वळणावरून आपले वाहन पलटवीत असताना विरुद्ध दिशेने येणारे कार क्रमांक CG 04 CH 9630 चे चालकाने कंटेनरचे मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने कारच्या आतील सर्व एअरबॅग उघडले असून चालक नामे दिनेश कुमार प्रजापती वय 47 वर्ष, 2) सौ पार्वती प्रजापती वय 42 वर्षे 3) पियुष प्रजापती व 19 वर्ष 4) कार्तिके प्रजापती वय 11 वर्ष सर्व राहणार खमतराई रायपुर हे सर्व किरकोळ जखमी असून सर्व जखमींना तात्काळ शासकीय वाहनाने पीएचसी सावनेर येथे उपचारास पाठविण्यात आले.
अपघाताचे कारण: कारचालकाते आपले वाहन वेग मर्यादा न ठेवता भरधाव वेगाने चालवल्याने अपघात घडून आला आहे.