✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समर्था इव्हेंट अँड सिने प्रोडक्शन तर्फे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी फनटास्टिक समर कॅम्प – २०२३ चे आयोजन हिंगणघाट येथे करण्यात आले आहे. सुट्ट्यांमध्ये मुलांना या शिबिरात विविध कला, खेळ, बौद्धिक, वक्तृत्व, नृत्य, अभिनय, गायन, हस्ताक्षर, चित्रकारी, इत्यादी गोष्टी तज्ञांकडून शिकायला मिळणार आहे. सदर शिबिर ५ मे ते १४ मे या कालावधीत रोज सकाळी ८ ते ११ स्थानिक दुसरा माळा, मिलन सुपरमार्केट, येथे तर रोज दुपारी ३.३० ते सां. ६.३० स्थानिक माधव ज्ञानपीठ, शिवाजी पार्क जवळ घेण्यात येणार आहे. मुले आणि पालक यांच्या करता ही एक परवणी असून गावातील सर्व मुला मुलींनी या शिबिरात सहभागी होऊन आपले छंद जोपासत सुट्टी चा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे. अधिक माहितीसाठी ८३२९५६९९८६ या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावे.