महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- मधील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकी मध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून ओझर खुर्दच्या दीपाली लताई वर्पे यांचा 1189 मतधिक्यानी विजयी झाल्याची माहिती मिळून आली आहे.
काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वा खाली महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवाला आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवाराना थोरात यांनी शुभेच्छा दिल्या.
त्या मध्ये ओझर च्या सौं. दीपाली भाऊसाहेब वर्पे यांचा सर्वधिक मतांनी 1189 विजय झाला असून त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाली आहे. त्यांची ओझर खुर्द चे नूतन सरपंच सौं मनीषा साबळे व माजी सरपंच पुंजाहारी शिंदे उपसरपंच दगडू शेपाळ, अण्णासाहेब थोरात, भाऊसाहेब वर्पे, अमोल वर्पे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्तच्या वतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूक मध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवार वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

