नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये समोर आलेल्या या घटनेवरुन हुंडाबळीचा हा समाजाला लागलेला किती मोठा कलंक आहे. त्याची परिसीमा आजही तितकाच गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय.
एका 22 वर्षीय तरुण विवाहीतेला चक्क जहर पाजण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. नांदेडमधून उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वीकडे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील पीडित विवाहितेची मृत्यूशी झुंज सुरू असून. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. मात्र आता पर्यंत कुणालाही अटक कऱण्यात आलेली नाही त्यामुळे विवाहितेच्या परिवारात तीव्र रोष दिसून येत आहे. सासरच्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विवाहितेची मृत्यूशी झुंज सुरु…
नांदेड येथील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना समोर आलीय. हुंडची रक्कम मिळावी नाही, म्हणून 22 वर्षांच्या तरुण विवाहितेला तिच्याच सासरच्या मंडळीने विष पाजल. असा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित तरुणी गंभीर असून तिची प्रकृत्य अत्यंत नाजूक असल्याचं कळतंय. या विवाहीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.