अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. ९८२२७२४१३६
सावनेर:- नागपूर येथील ताजाबाग ताजुद्दीन बाबांच्या १०० व्या वार्षिक उर्स निमित्त श्री. ताजुद्दीन बाबा दर्गा वाकी येथून शाही संदल काढण्यात येणार आहे. 22 ऑगस्ट सोमवारी सकाळी १० वाजता हा संदल नागपूरकडे प्रस्थान करेल. दुपारी १२.३० वाजता हा संदल छोट्या ताजबाग साकरदरा स्थित अन्नक्षेत्र येथे पोहोचेल तिथे महाप्रसाद, कव्वाली होईल. नंतर संदल २ वाजता निघून साकरदरा बाबांच्या दरबारामध्ये श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम), श्रीमंत राजे मोधोजी भोसले (पंचम), श्रीमंत राजे जयसिंग भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबांच्या पलंगावर चादर चढण्यात येईल. नंतर संत राजू बाबा दरबार येथे प्रभाकर भोसले यांच्या उपस्थितीत संत राजू बाबांना चादर अर्पण करण्यात येईल. यानंतर शाही संदल सकरदरा चौक, भांडे प्लॉट चौक, मार्गाने ताजबाग शरीफ कडे रवाना होईल. सायंकाळी ६ वाजता हा संदल ताजबाग शरीफ येथे पोहोचेल. बाबांच्या समाधीवर संदल, चादर, फुल, चढविण्यात येईल. सर्व भाक्तांच्या सुख-समृद्धीकरिता प्रार्थना करण्यात येईल.
या भव्य दिव्य शाही संदल मध्ये जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून बाबांच्या आशीर्वाद घ्यावा असे आव्हान श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष- प्रभाकरजी डाहाके (पाटील) सचिन- ज्ञानेश्वर डाहाके (पाटील), विश्वस्त मधुकर टेकाडे, बापूराव ताजने, सचिन डांगोरे यांनी केले आहे.