पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- परराज्यातील मुली / महिला यांना काही इसम वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेवुन त्यांना वेश्या व्यवसाकरीता पुरवित
असलेबाबत सामजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार तुषार भिवरकर व अमित जमदाडे यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली. त्यानंतर अशा एजंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढून, सामाजिक सुरक्षा विभाग कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि.०१.०५.२०२३ रोजी सापळा रचुन बनावट ग्राहका करवी वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, एजंटने पुणे स्टेशन परीसरातील पंचताराकिंत हॉटेल येथे दोन रूम बुक करण्यास सांगितल्या त्यांनतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रूम मध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजेंटसह येरवडा परीसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून महाराष्ट्र हौसींग सोसायटी येरवडा पुणे येथून दोन पिडीत मुली व तीन एजेंट (आरोपी) मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, सदर तीन आरोपी त्यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुरनं. १५२६ / २०२३ मादवि कलम ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३.४.५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून चार पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई गा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा करें, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, अगित जगदाडे.. ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.