✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन गिरड सर्कल मधील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश सोहळा राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात आयोजत करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, सुभाष चौधरी, प्रा.गोकुल टिपले, राजू मुडे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नानाजी भाजीपाले, सचिन दाते, विजय ढगे, प्रशांत बावणे, विलास गाठे, शुभम बावणे, रवींद्र बावणे, आकाश बावणे, उमेश बावणे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केल्यानंतर सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.