पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २६/०४/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा ते दिनांक २७/०४/२०२३ रोजी ०६.१५ वा. चे दरम्यान कात्रज- कोंढवा रोडवरील शत्रुंजय जैन मंदिर बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने मंदिराचे दक्षिण दरवाजाकडील खिडकीची काच फोडून त्यावाटे मंदिरात प्रवेश करून मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करून नेल्याबाबत मंदिराचे व्यवस्थापक राजकुमार बन्सीलाल राजपुत यांच्या फिर्यादी वरून कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४४१ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार सदर आरोपीचा शोध घेत असताना दि. २८/०४/२०२३ रोजी तपास पथकाचे पो. अं. / ४९० सुरज शुक्ला व पो.अ./४८४५ अनिल बनकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) नारायण मारुती गवळी उर्फ नान्या, रा. टिळेकरनगर, कोंढवा बु. पुणे, २) आदित्य गाडे, रा. पौड फाटा, कोथरूड, पुणे, ३) यश परदेशी, रा. पौडरोड, पुणे व त्यांच्या साथीदारांनी केला असून त्यातील नारायण मारूती गवळी उर्फ नान्या हा काळ्या रंगाचा टि शर्ट व बरगुडा घालून इस्कॉन मंदिराचे पाठीगागिल पाण्याचे टाकी जवळ थांबलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोहवा / ११६५ सतिश चव्हाण,पोहवा / ७९ निलेश देसाई, पोना / ७७८२ जोतिबा पवार, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोळं / १०९१६ सागर भोसले, पोर्स / ८५९१ लक्ष्मण होळकर. पो. अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पोअ / २१८५ सुजित मदन, पोअ ४९० सुरज शुक्ला व पो.अं./४८४५ अनिल बनकर यांनी नारायण गारूती गवळी उर्फ नाऱ्या यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास करून आरोपी नामे १) हसन मगदुम बादशाह इंटगी, वय १८ वर्षे, रा. संतोष नगर चर्च जवळ, कात्रज, पुणे. २) वेजस दिपक सणस उर्फ चिक्या, वय १९ वर्षे रा सुमती बालवन शाळे शेजारी, सणस नगर, निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे, ३) आदित्य राजू गाडे वग १८ वर्षे, रा. खडकेश्वर महादेव मंदिर समोर, केळेवाडी, पौड फाटा, कोथरूड, पुणे यांना अटक करून इतर ४ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी ३७.२१२/- रू रोख रक्कम जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती पौर्णिमा तावरे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले व मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोहवा / ७९ निलेश देसाई, पौना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोना / ७१८२ जोतिबा पवार, पो. अं. / २१८५ सुजित मदन, पो. अं. / ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं./८५९५ लक्ष्मण होळकर, मो.अं. १०११६ सागर भोसले, पो अं/ ४९० सुरज शुक्ला व पो अ / ४८४५ अनिल बनकर यांच्या पथकाने केली आहे.

