संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- येथे इंदिरा जिनिग प्रेसिंग सोसायटी कार्यालयाचे उद्घाटन नुसतच श्री. अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले.
इंदिरा जिनिग प्रेसिंग सोसायटीचे कार्यालय राजुरा येथे स्थापन झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आपला शेती माल घेऊन दूर विक्रीसाठी न्यावे लागणार नाही. यावेळी उपस्थित मेघताई नलगे माजी जिल्हा परिषद सदस्य, संध्या चांदेकर कांग्रेस महिला शहर अध्यक्ष, सोसायटीच्या संचालक कविता उपरे, योगिता भोयर, श्री सुनील देशपांडे, एजाज अहेमद, प्रभाकर येरणे, श्री बंडूभाऊ घटूवार तसेच सोसायटी इतर सभासद व सदस्य तसेच राजुरा शहरातील कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.