✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नागपूर हैद्राबाद हायवे न. 44 वरती अवैधरित्या ट्रकमध्ये गोवंश कोंबून हैदराबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ३५ गोवंशांचे सुरक्षित सुटका करून आरोपी ट्रक चालकावर केली कारवाई स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पथकाने शेडगाव फाटा परिसरात ता. ५ रोजी केली. पोलिसांनी ट्रकसह २५ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शेख शहानवाज शेख मेहबूब वय 26 वर्ष रा. कुरेशी नगर, भाजीमंडी कामठी, जि. नागपूर असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंश नेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.दरम्यान, पोलिसांनी शेडगाव फाटा परिसरात नाकाबंदी केली असता एम.पी. ०४ एचई. ३५१५ क्रमांकाचा ट्रक भरधाव जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकला थांबवून पाहणी केली असता गोवंशांना अत्यंत क्रूररीत्या निर्दयतेने ट्रक मध्ये कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून गोवंशांची सुखरूप सुटका करून हिंगणघाट येथील गोसंरक्षण शाळेत पाठविण्यात आले.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी समुद्रपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, सुभाष राऊत, राजेश तिवस्कर, अवी बनसोड, विकास अवचट, राकेश आष्टनकर, संजय राठोड, अमोल ढोबळे यांनी केली.