पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तक्रारदार दादा नारायण शेलार यांनी तक्रार दिली की, दि.०६/०५/२०२३ रोजी तक्रारदार व त्यांचे सोबत आणखी चार कामगार असे खराडी बायपास चौकातील सिग्नलचे काम करत असताना त्यांनी त्यांचेकडील मारुती सुझुकी कंपनीची ईको गाडी नं MH.12./R.T. /6923 ही रात्री ०९/०० वा. चे सुमारास तुलसी हॉटेलचे समोर खराडी बायपास येथे सार्वजनिक रोडवर पार्क केली होती त्यानंतर त्यानी सदर गाड़ी ही रात्री ११/५० वा चे सुमारास पाहिली असता त्यांना सदर गाड़ी पार्क केले ठिकाणी दिसली नाही म्हणुन त्यांनी तक्रार दिले वरून चंदननगर पो. स्टे येथे गुन्हा रजिस्टर नं १९३ / २०२३ भादवि कलम ३५९ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता.
दि. ०७/०५/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अमदार १०१९६ नामदेव गडदरे, पोशि १०७२८ संतोष शिंदे पोहवा ५२२ गजानन पवार, पोना ६७११ नितीन कांबळे, पोशि ८२११ प्रदिप घोडके, पोशि ८४६१ विजय गायकवाड, असे रात्रपाळी ड्युटीस चंदननगर पोलीस स्टेशनला हजर असताना पोलीस अंमलदार गडदरे है सदर गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना दरम्यान पो. अं. नामदेव गडदरे व प्रदिप घोडके यांना त्यांचे गोपनिय बातगी दारामार्फत मिळालेल्या बातमी वरून अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता गणिपाल हॉस्पीटलचे बाजुला असलेल्या पडक्या बिल्डींगये समोर अधारात एक इको गाडी नं MH.12. / R. T. /6923 ही उभी असलेली दिसली सदर गाडीचे बाजुला एक इसम उमा होता त्यास पोलीस असल्याची चाहुल लागताच तो पळुन जावु लागल्याने स्टाफने त्यास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रामेश्वर अर्जुन मिस्कीन, वय २६ वर्षे, रा- मु/पो. सरडेवाडी, ता- इंदापुर, जिल्हा- पुणे असे असल्याचे सांगुन पोलीसांनी सदर चारचाकी गाडीबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरची गाडी ही दि.०६/०५/२०२३ रोजी रात्री खराडी बायपास भागातुन चोरल्याची कबुली दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून त्याचेकडुन ५,००,०००/- रू ( पाच लाख रूपये किमतीची इको चारचाकी गाडी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा, राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अमदार १०१९६ नामदेव गडदरे, पोशि १०७२८ संतोष शिंदे, पोहवा ५२२ गजानन पवार, पोना ६७११ नितीन कांबळे, पोशि ८२११ प्रदिप घोडके, पोशि ८४६१ विजय गायकवाड यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके हे करत आहेत.

