विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा
चोपडा,दिनांक 19 ऑगस्ट:- रोजी जागतिक फोटोग्राफी दिवस सर्व जगभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, त्यामुळे चोपडा तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांनी जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी आठ वाजेला छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे सर्व फोटोग्राफर बांधव एकत्रित येऊन असोसिएशनचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शेंगदाणे व शहर प्रमुख विलास कोष्टी आणि सहकारी पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
त्याचप्रमाणे जागतिक फोटोग्राफी दिनाचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन मोटरसायकल रॅली अडावद येथे आली मोटर सायकल रॅली अडावद गावात फिरून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले तीर्थक्षेत्र उनपदेव येथे संपन्न झाली. नंतर उनपदेव येथे असोसिएशनचे ग्रामीण विभाग प्रमुख नरेंद्र पाटील किरमाणी व अडावद परिसरातील असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व फोटोग्राफर सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण केले वृक्षारोपणासाठी वन विभागातील वनश्री पुरस्कार प्राप्त दशरथ पाटील आणि सूर्यवंशी दादा यांनी मोलाचे सहकार्य केले तदनंतर फोटोग्राफरचे दैवत फोटो कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, ड्रोन आधी साहित्यांची विधिवत पूजा असोसिएशनचे अपंग सदस्य रामचंद कोळी, लॅब प्रमुख शफिक खोकर प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चौधरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले तसेच सर्व सदस्यांनी पूजन केले.
याप्रसंगी फोटोग्राफर सदस्यांचे परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. असोसिएशनचे जेष्ठ सदस्य ए पी पाटील सर आणि दीपक सिसोदिया सर यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व व्यवसायाशी निगडित माहिती देऊन सर्व सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच निलेश पालीवाल, ज्ञानेश्वर सोनगिरे, छोटू किरमाणी, प्रकाश पाटील या सदस्यांनी आपले व्यावसायिक अनुभव व मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन असोसिएशनचे प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चौधरी यांनी केले कार्यक्रमानंतर अडावद परिसर फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सर्व फोटोग्राफर सदस्य यांनी परिश्रम घेतले.