महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन (प्रतिनिधी) लाखांदूर:- आज सर्वत्र पर्यावरणाची हानी होत आहे. पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, प्रदूषण, जंगलातले वणवे आणि गेल्या काही वर्षांत अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. माणसाचं अस्तित्व पर्यावणातल्या इतर सर्व घटकांवर कसं अवलंबून आहे. तुम्ही राहात असलेल्या गावात एकदम मोठे बदल करणं प्रत्येकालाच शक्य नसतं, पण आपण टाकलेली छोटी पावलंही मोठी मजल मारण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. आपण जितकं निसर्गाकडून घेतो, तितक त्या पर्यावरणाच सवर्धन पण आज गरजेचं आहे. अशाच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या लग्न सोहळ्याला जाण्यापूर्वी दोनाड येथील महाराष्ट्र संदेश न्युजचे भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी विक्की सुनील डोके यांनी केला.
लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील नवरदेवाने आज 7 मे रोजी लग्नासाठी वधुच्या गावी घरून निघण्यापूर्वी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. विक्की सुनील डोके असे तरुणाचे नाव आहे. एकीकडे शासन पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनावर विशेष भर देत असले तरी अलीकडे अनेकांना पर्यावरण रक्षणाचा विसर पडत चालला आहे. मात्र, याला काही अपवादही आहेत. लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील विक्की डोके यांचा पवनी तालुक्यातील नवेगाव (बाजार) येथील मंजू नामक युवतीशी रविवारी लग्न सोहळा नियोजित होता. वधुमंडपी जाण्यापूर्वी नवरदेवाने आपल्या गावी वृक्षरोपन करून आपले लग्न कार्य संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348