सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- वाशिम शहरातील अकोला नाका भागातील पेट्रोल पंपालगत असलेल्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे. ही बाब पाहता तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य आजच्या पिढीला व भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शक ठरावे. या उदात्त हेतुने अकोला नाका परिसरातील मोकळ्या जागेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने राम पाटील डोरले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, शहरातील अकोला नाका परिसर हा मुख्य वर्दळीचा परिसर आहे. हा चौक अकोला -नांदेड या महामार्गावर देखील आहे. तसेच याच चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम नगर परिषद, आरटीओ कार्यालय आदी कार्यालयाकडे जावे लागते. मात्र, अकोला नाका या मुख्य चौकाच्या अग्रभागी असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे. ही बाब पाहता या चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. जेणेकरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केलेले अजरामर कार्य आजच्या व भविष्यातील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. तसेच या परिसराची शोभाही वाढेल व होणारे अतिक्रमणही थांबेल. ही माफक अपेक्षा ठेवून आपण अकोला नाका परिसरातील अग्रभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारावे अशी रास्त मागणी, आम आदमी पार्टीच्यावतीने राम पाटील डोरले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीचे कार्य प्रेरणादायी
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्य आजची पिढी विसरत चालली आहे. त्यामुळे हे कार्य आजच्या पिढीला तसेच भविष्यातील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरावे या उदात्त हेतूने अकोला नाका परिसरातील पेट्रोल पंपालगत असलेल्या मोकळ्या जागेवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्मारक उभारावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती राम पाटील डोरले यांनी दिली आहे.