वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- वंचित बहुजन रिक्षा युनियन पुणे शहरचे कार्यकर्ते अक्षय चंदनशिवे यांना खराडी येथे पठारे यांनी काल बेदम मारहाण करीत, जातीवाचक शिवीगाळ केली. याच्या विरोधात आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खराडी पोलीस चौकी येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, माथाडी जनरल कामगार युनियन, युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, रात्रीपासून चंदन नगर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर पठारे याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी प्रयत्न करत असताना येथील पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक सुमारे चार तास कार्यकर्त्यांना ताटकळत चौकी बाहेर उभे केले.
तक्रारदाराचे काही एक म्हणणे ऐकून घेतले नाही, उलट स्थानिक माजी आमदार आणि त्यांच्या चिरंजीव यांना व्हीआयपी ट्रीटमेंट ही पोलीस चौकीमध्ये देण्यात आली, मारहाण करणारे व जातीवाचक शिवीगाळ करणारे आरोपी हे माजी आमदार यांच्या जवळचे नातेवाईक असून प्रशासन व त्यांचे समर्थक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीमध्ये ठिया आंदोलन सुरू केले. जोपर्यंत FIR कॉपी हातात मिळणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. शेवटी घटनेनंतर 24 तासाने वंचित बहुजन आघाडीच्या लढाईला यश आले. चंदननगर पोलीस स्टेशन येथे जातीयवादी मानसिकतेच्या पठारे वर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अट्रोसिटी) आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना जो पर्यंत अटक केली जाणार नाही, तो पर्यंत पोलीस स्टेशन मधुन हलणार नाही अशी कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली होती.

