युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ:- वंचित बहुजन आघाडी व कलम तालुक्याच्या वतीने यवतमाळ जिल्हा पूर्व अंतर्गत कळंम तालुका कार्यकारिणीच्या वतीने राजस्थान येथील, इंद्र मेघवाल या दलित विदर्थ्यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करीत भव्य आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व यवतमाळपूर्व जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, तालुकाध्यक्ष सुगत नारायणे, महिला जिल्हा ध्यक्ष धम्मवती वासनिक, प्रसिद्धी प्रमुख शिवदास कांबळे, विजय बुरबुरे, विजय थोरात, रोमांत पाटील, सल्लागार पुष्पाताई सिरसाठ, महासचिव सरला चचाने, करुणाताई मुन, यवतमाळ शहराध्यक्ष करुणाताई चौधरी, महासचिव रत्नमाला कांबळे, शिलाताई वैदय व बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाचे नेतृत्व यांनी केले व शेकडो महिलांनी मोर्च्यात सहभागी झाले होते.