✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर पोलिसांनी एक चोरीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा दालमिल मधून डाळ चोरीच्या छळा लाऊन आरोपीला बेळ्या ठोकल्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीस स्टेशन समुद्रपुर अप क. 324 / 2023 कलम 381 भा.द.वी नुसार दि. 05 मे रोजी दाखल असुन, यातील फिर्यादी अभय तांबोळी, रा. हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला कि, त्यांचे मालकिचे हिंगणघाट ते जाम रोडवर गुरुप्रसाद दालमिलमध्ये मागील 01वर्षापासुन कोणीतरी अज्ञात चोरटे तुरीचे कट्टे चोरून नेत असुन मागील महिण्यात त्यांनी तुर दाळीचे कट्यांची मोजणी केली असता, त्यामध्ये 50 कट्टे कमी असल्याने सदर चोरीबाबत कंपनीतील कामगारांवर त्यांना संशय असल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्टवरून सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात डि.बी. पथकाने सदर कंपनीमध्ये काम करीत असलेला शिवनंदी हरीप्रसाद कनोजिया, रा. झिलमिली जि. छिंदवाडा (म.प्र.) ह.मु. गुरुप्रसाद कंपनी कॉटर जाम, तह. समुद्रपुर यास संशयावरून ताब्यात घेवुन गुन्ह्यासंदर्भाने विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे ईतर साथीदार नामे 2) शेर अली उर्फ सोनु नुर अली सैय्यद, रा. हिंगणघाट 3) सुभाष काशिनाथ गायकवाड, रा. कुंड शेगाव, ह.मु. हिंगणघाट 4) रविंद्र एकनाथ मोहुर्ले, रा. चिखलगाव, चंद्रपुर ह.मु. हिंगणघाट 5) प्रतिक विरेंद्र दुर्गे, रा. हिंगणघाट यांचेसोबत संगणमताने मिळुन केल्याचे सांगितल्याने, ईतर आरोपीतांना सुध्दा तात्काळ अटक करून, आरोपीतांना न्यायालयासमक्ष हजर करून पि.सी.आर प्राप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात आला.
पि.सी.आर. दरम्यान सर्व आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली देत, मागील 01 वर्षापासुन 10 वेळा प्रत्येकी वेळी अंदाजे 20 कट्टे चोरी केले असुन, चोरी केलेला मुद्देमाल (तुर दाळीचे कट्टे) हे वेगवेगळ्या दुकानदारांना व लोकांन आरोपी सोनु अली, सुभाष गायकवाड व रविंद्र मोहुर्ले यांनी स्वतः शेतकरी असल्याची बतावणी करून, त्यांची शेती असल्याचे सांगितले व ते त्यांचे शेतात कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता,
नैसर्गिक रित्या तुरीचे उत्पादन घेत असुन, स्वतः घरी तुरी पासुन दाळ तयार करतात, असे सांगुन
स्वतः दाळीचे सॅम्पल दाखवुन, प्रती कट्टा (50 किलो) 6,000 रू. दर सांगुन, तसेच पैसे सुध्दा काही महिण्याच्या अवधीने घेण्याचे आश्वासन देवुन विक्री केल्याचे सांगितल्याने, आरोपीतांनी ज्या दुकानदार व लोकांना त्यांनी चोरी केलेल्या तुर दाळीचे कट्टे विक्री केले त्यांना निष्पन्न करून, आरोपीतांसह त्यांचेकडे जावुन, त्यांचेकडुन त्यांनी खरेदी केलेले तुर दाळीचे कट्टे जप्त करण्यात आले. तसेच सदर गुन्ह्यात आरोपीतांनी चोरी केलेल्या मुद्देमालाची वाहतुक करणेकरीता वापरलेले दोन वाहन गुन्ह्याचे पुरावेकामी जप्त करण्यात आले.
सदर गुन्ह्याचे तपासात आज पर्यंत आरोपीतांनी चोरून नेलेले तुर दाळीचे 50 किलो वजनाचे एकुण 200 कट्टे किं. प्रती कट्टा 6,000 रू. प्रमाणे कि. 12,00,000 रूपये एक हिरव्या रंगाचा जॉर्न डिअर कंपनीचा ट्रॅक्टर क. MH-32/AH-9196 कि. 6,00,000 रू. व त्याला लागून असलेली एक हिरव्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली किं. 1,50,000 रू. व एक टाटा एस मालवाहु गाडी
क. MH-04/FU-3282, किं. 4,00,000 रू. असा जु.किं. 23,50,000 रू. चा संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांची सद्यस्थिती एम. सी. आर. वर आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. विरेंद्र मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो. शि. वैभव चरडे यांनी केली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348