उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, विश्वशांती बौद्ध विहारात लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाच्या केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या मार्फत, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस विविध प्रकारचे कार्यक्रम घेवून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

