अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं.-९८२२७२४१३६
सावनेर:- येथील श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती महाजन लेआऊट सावनेर येथे दोन दिवसीय गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम तसेच आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाला.
गुरुवारला मंदिरात पूजा – पाठ भजन व आरती करण्यात आली.तसेच .सायंकाळी ह. भ. प. श्री.भागवताचार्य तेजराम महाराज कांजेकर नरखेड यांचे जन्मोत्सव पर्वावर कीर्तन झाले.
शुक्रवारला दुपारी ११ ते २ पर्यंत ह. भ. प. श्री.भागवताचार्य तेजराम महाराज कांजेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दु.२ ते ५ वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे डॉ. मयूर डोंगरे (हृदय रोग व मधुमेह तज्ञ ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
सायंकाळी ५.३० वा.देवाची महाआरती झाली आरती नंतर लगेच ७ ते १० पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रमाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.
गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमात भक्तांची भरपूर उपस्थिती असल्याची माहिती श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती द्वारे देण्यात आली.