पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०५/०५/२०२३ रोजी महिलेची छेडछाड तसेच जिवे मारण्याची धमकी देवून पाठलाग करुन हात धरल्याने फिर्यादी यांनी त्याबाबत सोहेल सलीम मुल्ला यांचेविरुध्द समर्थ पोलीस ठाणे गु.र.नं ११० / २०२३ मादविक ३५४ (ड) ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.
दि.०८/०५/२०२३ रोजी युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व इम्रान शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे सोहेल सलीम मुल्ला हा खडीचे मैदान सोमवार पेठ पुणे येथे त्याच्या मित्राकडे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून परवानगीने युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमी प्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सोहेल सलीम मुल्ला वय २२ वर्ष रा. फ्लॅटनं ३०६ डी बिल्डींग विमाननगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे समर्थ पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी समर्थ पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग असे गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार गा. सह पोलीस आयुक्त.. पुणे शहर, श्री संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री अगोल झेंडे गा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १. पुणे शहर श्री सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वपोनि क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद, सपोनि आषिश कवठेकर, पोलीस अंगलदार अमोल पवार, निलेश साबळे इम्रान शेख, अय्याज दड्डीकर आण्णा माने यांनी केली आहे.

