१० मे स्वाभिमानी दिना निमीत्य वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष एड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अर्थात १० मे स्वाभिमानी दिनानिमीत्य वंचित बहुजन आघाडीच्या वतिने ६९ कार्यकर्त्यांच्या रक्तदानासह सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात फळं वाटप व येथिल इंदिरा गांधी चौकात केक कापून शितपेयाचे पॉकेट, बाटल वाटप करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबवून वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.
यावेळी वांचीतच्या ६९ कार्यकर्त्यांचे रक्तदान व फळ वाटप केल्या नंतर येथिल इंदिरा गांधी चौक येथे सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर महासचिव योगेंद्र बांगरे, जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, संघटक धर्मेंद्र गोवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर, रवी केवटकर आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी एड बाळासाहेब आंबेडकर यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यावर प्रकाश टाकून दिर्घायुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. या कार्यकर्माचे प्रास्ताविक शहर महासचिव सोनलदिप देवतळे यांनी केले तर संचालन तालुका उपाध्यक्ष मुकेश डोंगरे व आभार जावेद शेख यांनी मानले. दिवसभरातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी, किरण हजारे, रवी निकोडे, भारत रायपूरे, क्रिष्णा शेंडे, महागू शेंडे, आशिष केळझरकर, वैभव कोटांगले, कवडू दुधे, प्रविणय खोब्रागडे आदिंनी अथक परिश्रम घेतले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348