निर्मल इंटरनॅशनल स्कूल चा 100% निकाल
ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो. न. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी. इ. व 12 वी मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 12 वी मध्ये एकूण 12 विद्यार्थी प्रविष्ठ होते तर इ. 10 वी मध्ये 126 विद्यार्थी प्रविष्ठ होते. सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील 12 वी मध्ये कुमारी अनुष्का गणेश भारास्वडकर हिने 97.40% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे कु.तन्मय शरद माथुरवैश्य याने 95% गुण मिळवून द्वितीय आणि कु. यश शशिकांत येवले 92.20% गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इ. 10 वी मध्ये कु. वैभव रामदास पाटील यांने 97.40% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कु.आर्यन विजय ललवाणी 97.00 गुण मिळवून द्वितीय तर कु. देवांश प्रल्हाद पाटील 95.20 तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ स्नेहल पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.