Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा: तंबाखू नियंत्रण समितीच्या पानटपरींवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतांना 12 टपरींवर कारवाई, 2600 चा दंड वसूल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा: तंबाखू नियंत्रण समितीच्या पानटपरींवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतांना 12 टपरींवर कारवाई, 2600 चा दंड वसूल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि 12:- वर्धा येथील आरती चौक व सेवाग्राम चौक या प्रमुख मार्गावरील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणाऱ्या 12 पानटपरीवर तंबाखू नियंत्रण समितीने धाडी टाकल्या. या धाडीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त दि.1 ते 31 मे या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या दुष्परिणा बाबत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपरींवर देखील कारवाई करण्यात येत आहे. समितीने केलेल्या या कारवाईत 2 हजार 600 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई तंबाखु नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सल्लागार डॉ.नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम, राजेश यादव, श्री. धकाते व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

तंबाखू व तंबाखूजन्च पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाढती संख्या लक्षा घेता उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, हृदयविकार, कॅन्सर यासारखे आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत असतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. जो शरीराला हानिकारक ठरतो. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच 29 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सुपारी, पान, पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास व थुंकण्यास व धुम्रपान करण्यास मनाई तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, खाणे व धुम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, 10 वी सीबीएसई बोर्डचा निकाल 100 टक्के लागला.

Next Post

पाचोरा: निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पाचोरा: निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

पाचोरा: निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व 12 वी मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In