नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या खुल्या पील्लर पद्धतीने उडांन पुलाच्या बांधकाम मागनीला यश.
तिरुपती नल्लाला,राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा ते परसोडा राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या जोमाने चालू झाले आहे परंतु कोरपना येथील उड्डाण पूलाचे बांधकाम बंद पद्धतीने सर्वे केले होते त्यामुळे व्यापार्यांचे व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते त्या अनुषंगाने दिनांक 06 मे रोजी पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामांचे निवेदन ना. नितीन गडकरी यांच्याकडे ना. सुधीर मुनगंटीवार वन, मस्य, सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली उडानपुलाचे पील्लर बांधकाम खुल्या पुलाची मागनी देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी निवेदन दिले व मागनी रेटुन धरली या मागणीची दखल घेत दिनांक 12 मे शुक्रवारी दुपारी तीन वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या सोबत शासकीय अधिकारी व भाजपा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भेट दिली व नव्याने पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाचे बांधकाम होनार असी ग्वाही देण्यात आली. तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी ना. नितीन गडकरी व ना सुधीर मुनगंटीवार यांचे खुप खुप अभिनंदन केले व आभार मानले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, निलेशभाऊ ताजने माजी नगरसेवक, राम सेवक मोरे नगरसेवक, अरुण भाऊ डोहे नगरसेवक, अमोल आसेकर माजी नगरसेवक, अरुणभाऊ मडावी माजी सरपंच, रमेश मालेकर जेष्ठ नेते, शशिकांत आडकीने उपसरपंच, संदीप शेरखी शक्ती केंद्र प्रमुख, जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष, प्रमोद पायघन शक्ती केंद्र प्रमुख, विजय पानघाटे, संदीप टोंगे, पद्माकर धगडी, कार्तिक गोंडलावार आदी भाजपा पदाधिकारी, व्यावसायिक, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348