पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- जिल्हात दिवसा ढवळ्या जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळ्या हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड शहर धडक कारवाई करत या हत्याकांडाचा स्पर्डाफास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आज दि.13 मे रोजी वरिष्ठांच्या आदेशाने व त्यांचे मार्गदर्शना खाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. 233/2023 भा.द.वि.क. 302 120 (ब) आर्म अॅक्ट 3(25), 4( 25 ) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135 क्रिमीनल लॉ अमेन्टमेंट अॅक्ट कलम 7 या गुन्ह्राचा आम्ही स्वत: तसेच वपोनि सपोफौ किरनाळे,पोहवा 858 बनसुडे, पोहवा. 976 बहीरट, पोहवा 1009 ठाकरे,पोहवा. 858 राठोड, पोना. 1900 शेख, पोशि 1898 गाडेकर, पोशि 1305 खेडकर, पोशि 1303 इघारे, पोशि. 2017 भोसले, पोशि. 2571 गुट्टे पोशि 2252 निरवने पोशि 2192 ब्राम्हंादे असे समांतर तपास करत असताना पोहवा 718 बनसुडे व पोशि 2571 गुट्टे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्ह्रातील आरोपी नामे श्रीनिवास ऊर्फ शिनु व्यंकटस्वामी शिडगळ हा देहुरोड बाजार येथे नेटके देशी दारु दुकानात दारु पिण्यासाठी आला आहे. अशी माहीती मिळताच दोन पोलीस पथक तयार करुन पोलीस पथकासह सदर ठिकाणी रवाना होवुन नेटके देशी दारुचे दुकानाच्या बाजुला पोलीस पथकाने सापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतला व त्यास त्याचे नाव पता विचारला असता त्यांन त्याचे नाव श्रीनिवास ऊर्फ शिनु व्यंकटस्वामी शिडगळ वय. 41 वर्षे रा. सध्या समता कॉलनी वराळे ता. मावळ जि. पुणे मुळ रा.शिवाजीनगर मरीमाता मंदीर जवळ देहुरोड ता. हवेली जि. पुणे असे सांगितले.
नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे वरील गुन्ह्रा बाबत कसुन चौकशी केली असता त्यांने सांगितले की, त्याने तसेच श्याम निगडकर रा. तळेगाव दाभाडे, प्रविण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे रा. नाणे ता. मावळ जि. पुणे, नन्या ऊर्फ संदिप विठ्ठल मोरे रा. आकुर्डी यांनी मिळुन गुन्हा केला असुन त्यांना त्यांचा साथिदार नामे आदेश विठ्ठल धोत्रे याने प्रविण धोत्रे याच्या आल्टो कारमध्ये गुन्ह्राचे ठिकाणी सोडले आहे असे सांगितले व गुन्ह्राची कबुली दिली आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईकामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.