आंदोलनकर्त्यांची आवाज दाबल्याने प्रशासनावर शहरातील अनेक स्तरावरून निषेध…
गांधी पुतळा ते स्थानिक आमदारांच्या घरापर्यंत होणार होते लोटांगण आंदोलन…
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत निर्णय होतात हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरामध्ये उभारण्याबाबत अनेक निवेदने व आंदोलने केले जात आहे. यातच आज हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाम इडपवार यांनी दुपारी अकरा वाजता उन्हाच्या तीव्रतेत कारंजा चौक येथे असलेल्या गांधी पुतळ्यां पासून तर आमदार समीर कुणावार यांच्या घरापर्यंत लोटांगण आंदोलनाची सुरवात करताच पोलिसांनी आंदोलक शाम इडपवार यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे.
हिंगणघाट शहरातील अनेक सामाजिक संघटना व विविध पक्षांकडून स्थानिक पोलीस प्रशासनाचा व प्रशासनाचा निषेध केला जात आहे. गांधीजींच्या जिल्ह्यात जर गांधीजींच्या पद्धतीने आंदोलन केले जाऊ देत नसेल तर हा गांधीजींचा अपमान आहे अशी देखील प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या कडून व्यक्त करण्यात आली आहे. एकंदरीतच हिंगणघाट शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याबाबत हिंगणघाट शहरातील अनेक संघटना नेते व स्थानिक जनता आक्रमक झाली असून, प्रशासनाने याची दखल घेणे महत्त्वाचे झाले आहे. श्याम ईडपवार यांना लोटांगण आंदोलन करू न देता स्थानबद्ध केल्याने हिंगणघाट शहरांमध्ये काहीं काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेणे महत्त्वाचे आहे.
हिंगणघाट शहराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यासाठी म्हणून हे लोटांगण आंदोलन होते. मात्र राजकीय दबावापोटी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला गेला असे प्रहार जनशक्ती पक्षाचे गजू कुबडे यांनी सांगितले. या दडपशाहीचा निषेध देखील प्रहारचे गजू कुबडे यांच्या माध्यमातून करण्यात आला.
हिंगणघाट तालुक्यातील ना शैक्षणिक सुविधाना आरोग्यासाठी चांगले शासकीय हॉस्पिटल ना रोजगाराच्या संधी. त्यामुळे येथील गुणवत्ता बाहेर गावी जावे लागत आहे. हे आपले दुर्दैव आहे.
महाराष्ट्र सरकारने विदर्भासाठी 11 मेडीकल कॉलेज जाहीर केले. त्यातील एक हिंगणघाट शहरात येईल अशी येथील भोळ्या जनतेची आशा होती. परंतु सत्तारूढ पक्षाच्या बाजूने दोन दोन आमदार असतानांही हे कॉलेज येथे येत नसेल तर काय? या दडपशाही घटनेच्या प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे जाहीर निषेध करण्यात आलेला आहे
काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे
यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत दडपशाहीचा धिक्कार केला. आमदार समीर कुणावार यांनीच पोलिसांवर दबाव टाकून हे आंदोलन उधळून लावले असा देखील आरोप काँग्रेसचे प्रवीण उपासे यांच्याकडून करण्यात आला
अतुल वांदीले, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस
हिंगणघाट शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी म्हणून हिंगणघाट शहरच नव्हे तर हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे मतदार संघातील प्रत्येक नागरिक आग्रही आहेत. अशातच हिंगणघाट शहरांमध्ये विविध स्तरावरून होणाऱ्या आंदोलनाला दाबणारा प्रकार निंदनीय आहे. श्याम इडपवार यांच्या लोटांगण आंदोलनास स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने व प्रशासनाने उधळून लावणे ही बाब अतिशय निंदनीय असून आम्ही पोलीस प्रशासनाचा व प्रशासनाचा निषेध करतो.