शासन, प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी जागृत व्हावे व प्रश्न मार्गी लावावा: सतीश धोबे तालुका प्रमुख शिवसेना (ठाकरे)
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील प्रस्तावित मेडिकल कॉलेज रुग्णालय हिंगणघाट शहरात व्हावे म्हणून आंदोलन पेटले आहे. हिंगणघाट शहरात आज दिनांक १६ मे २०२३ रोज मंगळवारला सामाजिक युवा कार्यकर्ता शाम इडेपवार यांनी हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज यावे यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी जागृत व्हावे व प्रश्न मार्गी लावावा या साठी कारंजा चौक येथून स्थानिक आमदाराच्या घरापर्यंत भर उन्हात लोटांगण आंदोलन करण्यास सुरुवात केली. ही माहिती संपूर्ण शहरभर पसल्याने तालुक्यातील जनते समोर आमदारांची बदनामी होईल म्हणून अचानक स्थानिक नेत्याच्या दबावाखाली प्रशासनाने या लोटांगण आंदोलनांला दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि शाम ला ताबोडतोब स्थानबद्ध करण्यात आले. अशा गंभीर आरोप सतीश धोबे तालुका प्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी लावला आहे
सतीश धोबे पुढे म्हणाले की, शांततेने जर कोणीही सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करत असेल तर त्याला या स्वतंत्र देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कि नाही.? आता पर्यंत असे वाटत होते कि देशात आपल्या मागणी साठी आपण स्वतंत्र आहो आंदोलन करण्यासाठी पण हे चुकीचा समज आहे हे आज दिसून आले. या ठिकाणी सुद्धा हुकूमशाही चा वापर होतांना दिसत आहे. जे काम स्थानिक नेत्यांनी करायला पाहिजे होते तेच लोक झोपेचे सोंग घेऊन असल्यामुळे सामान्य माणसाला (संघर्ष समिती च्या सदस्यांना) लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय आहे का ? आजची परिस्थिती पाहून उद्याला शामच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या संरक्षणाची जबबदारी शासनाची आणि आता आपली संघर्ष समिती ची आहे. असल्या दडपशाहीला आणि हुकूमशाही वृत्तीचा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आहे.
सतीश धोबे तालुका प्रमुख शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)