पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे आदेशान्वये दि. १६/०५/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उप- निरीक्षक, चंद्रकांत कामठे व त्यांचे पथक दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे व फरारी, रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, नवनाथ भोसले यांना खास बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजि नं.९८ / २०२२. भा.द.वि कलम ३०७, १४३, १४७, १४८. ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५) महा पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ कि. लॉ अमे. कलम ७ तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३ (१) (ii) ३(२) ३ (४) मधील पाहिजे आरोपी आनंद ऊर्फ सोनु सिध्देश्वर धडे हा त्याच्या दोन साथीदारांसह राजेंद्रनगर पी. एम. सी. कॉलनी, राजेंद्रनगर, पुणे येथे एका बिल्डींग मधील खोलीत लपुन बसला आहे अशी बातमी मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने दत्तवाडीचे तपास पथक अधिकारी श्री. चंद्रकांत कामठे यांनी दत्तवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे, विजय खोमणे यांना कळविले असता, त्यांचे मार्गदर्शनानुसार दत्तवाडी तपास पथकातील कर्मचा-यांची तीन पथके तयार करुन, सदर बिल्डींगला जाणा-या सर्व मार्गावरुन सापळा रचून बातमीप्रमाणे आरोपी १ ) आनंद ऊर्फ सोनु सिध्देश्वर धडे वय २२ वर्षे, रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे यास कौशल्यपुर्वक ताब्यात घेण्यात आले. त्यांचे सोबत त्याचे सहकारी नामे २) धनंजय गणेश अडागळे, वय २५ वर्षे, रा. तळजाई वसाहत, पद्मावती पुणे ३) प्रसाद ऊर्फ आप्पा नागेश कराळे, वय-२३ वर्षे, रा. २७६/ ए/१७, अपर इंदीरानगर, बिबवेवाडी पुणे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडे चौकशी करता सदर तीन आरोपीनी मिळून दि. १४/०५/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास लक्ष्मीनगरटपर्वती याठिकाणी इसम नामे स्वप्नील आरणे यांचेवर हत्याराने वार करून जबर दुखापत केलेबाबत सांगितले. सदर बाबत दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १३७ / २०२३. भा. द. वि. कलम ३२६.३४ अन्वये दाखल आहे. सदर गुन्हयांत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोक्क्यातील सराईत आरोपी सोनु घडे हा यापूर्वी ही सहकारनगर पोलीस ठाणे येथे मोक्का अर्तगत कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यात त्याला जामीन झाला होता. त्यानंतर पुन्हा खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयांत सहकारनगर पोलीस ठाणे ने केलेली दुसरी मोक्का कारवाई झाल्यापासुन तो सुमारे एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता. त्यांचेवर यापुर्वी तीन वेळा खुनाचे प्रयत्न, दुखापतीसह जबरी चोरी, विनयभंग, तडीपारीचा भंग, दंगली याबाबत सहकारनगर तसेच कोंढवा, स्वारगेट पोलीस ठाणे येथे यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याला दत्तवाडी पोलीस ठाणेकडील गुन्हयांत अटक करुन, त्यास मोक्का गुन्हयांच्या पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस ठाणे येथे देण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविण पाटील सौ. मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे श्री. राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पासगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे), विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस नाईक, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे पोलीस अंमलदार अनिस तांबोळी नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दिपक लोधा, अमोल दबडे, दयानंद तेलंगे पाटील, बाबासाहेब पाटोळे, गोरखनाथ मादगुडे, अमित चिन्हे, किशोर वळे यांनी केली आहे.