सौ. हनिषा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- च्या वतीने 2021 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र रकाण्यात जनगणना करण्या बाबत बल्लारपूरचे तहसीलदार हरडे याच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री भारत सरकार तसेच गृहमंत्री भारत सरकार नई दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. तसेच प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य मंत्रालय, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्री अन्य पिछडा वर्ग भटक्या जमाती महाराष्ट्, अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग नई दिल्ली ओबीसी ओबीसी समन्वय समिती व्दारे देण्यात आले.
निवेदन देते वेळी ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष विवेक खुटेमाटे याच्या नेत्वुत्वात तसेच मनोहर माळेकर सर, सुधीरभाऊ कोरडे, उमेश भाऊ कडू, संजय वटाणे सर सूर्यकांत साळवे, अमोल काकडे, शंकर काळे, राजेश बट्टे, शुभांगी तिडके, प्रकृती पाटील, सुनील खापणे, गणेश लांबट टेकाम, रणजीत धोटे, प्रभाकर कवलकर, रवींद्र देरकर, चंदू वाढई ,सुनिल भटारकर, राजेंद्र गौरकार, अशोक भोयर तसे ओबीसी समन्वय समितीचे मार्गदर्शक सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

