Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

बॅग हरवली, प्रामाणिकता अन माणुसकी गवसली’, कर्तव्य बजाविणाऱ्या निगडी वाहतूक पोलिसांनी हरवलेली बॅग केली परत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 20, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बॅग हरवली, प्रामाणिकता अन माणुसकी गवसली’, कर्तव्य बजाविणाऱ्या निगडी वाहतूक पोलिसांनी हरवलेली बॅग केली परत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता.19:- वाहतूक पोलिसावर नेहमी यांना त्या कारणावरून टीका टिपणी केली जाते. वाहतूक पोलीस हा कायमचा टीकेचा धनी बनत असतो. शिस्त दाखवली तरी टीका आणि कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी चिरमिरी घेऊन सोडले जाते अशी टीका .अशा टीकाकराना निगडी वाहतूक पोलिसांनी आपल्या कामातून चोख उत्तर दिले आहे .एका डॉक्टर महिलेची हरवलेली बॅग तिला परत करीत आपले कर्तव्य बजावले आहे .हा प्रसंग शुक्रवार (ता.१९)रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आकुर्डीतील खंडोबा बाळ चौकात घडला आहे.

सकाळचे अकरा, साडेअकरा वाजण्याची वेळ…आकुर्डीतील खंडोबा माळ चौक वाहनांच्या गर्दीने गजबजलेला…. कामाची घाईगडबड असल्याने येथील चौकातील रहदारी वेगात असते. कामात वेळेत पोहोचण्याची प्रत्येकाला घाई असते. केव्हा सिग्नल सुटेल याची प्रतीक्षा प्रत्येकाला असते. इतक्यात थरमॅक्स चौकातील सिग्नल सुटतो आणि वाहने वेगाने सिग्नल ओलांडून पुढे जाऊ लागतात एकापुढे एक जाण्याची जणू स्पर्धा जिंकलेली असते दरम्यान, रस्त्याच्या कडेला कोणाची तरी बॅग पडलेली असल्याचे कर्तव्यार असलेले पोलिस हवालदार अशोक गर्जे (निगडी वाहतूक विभाग) यांच्या लक्षात येते आणि ते ती बॅग उचलतात आणि शेजारील दुकानाच्या बाकड्यावर ठेवतात कोणीतरी बँगचा शोध घेईल या प्रतीक्षेत.. थोड्या वेळाने एक महिला गोंधळलेल्या अवस्थे मध्ये चौकात आली. वातावरणातील उष्मांक प्रचंड वाढल्याने प्रत्येकाच्या अंगाची लाही लाही होत होती. अशा उन्हात ही महिला काहीतरी शोधत असल्याचे हवालदार गर्जे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बाईला महिलेला काय झाले. याबाबत विचारणा केली असता त्या महिलेने माझी बॅग कुठेतरी हरवली आहे. त्यामध्ये माझे पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इतर लायसन्स असल्याचे तिने हवालदार गर्जे यांना सांगितले. हवालदार गर्जे यांनी त्या महिलेला बॅग कोणत्या रंगाची आहे याबाबत विचारणा केली असता. त्या महिलेने बॅकचा रंग काळा असून त्याचे बंद हे निळ्या रंगाचे असल्याचे सांगितले.
हवालदार गर्जे यांनी क्षणाचाही विलंब न करता शेजारच्या दुकानात ठेवलेली बॅग त्या महिलेच्या हातावर ठेवली ही तुमची बॅग आहे का… असा प्रश्न विचारताच त्या महिलेचा चेहरा आनंद फुलाला… हो .. ही माझी बॅग आहे असे म्हणत त्या महिलेने ती बॅग स्वीकारली.

यावेळी त्या महिलेने हवालदार गर्जे यांचे आभार मानले बॅगेतील सर्व वस्तू तपासले असता त्या सर्व वस्तू जशाच्या तशा मिळून आल्या. हरवलेली बँक पुन्हा सापडल्याचा आनंद त्या महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. ही महिला व्यवसायाने डॉक्टर आहे. निगडी वाहतूक पोलिसांची माणुसकी आणि प्रामाणिकपणा त्यांच्या कर्तव्यातून दिसून आला.

निगडी वाहतूक विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांना ही बाब समजताच त्यांनी हवालदार अशोक गर्जे यांचे कौतुक केले. याप्रसंगी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई दीपक तांदळे, महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयस राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्या, सांगलीच्या पालकमंत्री निवेदनातून मागणी.

Next Post

गडचिरोली: लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकी स्वार शिक्षक जागीच ठार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकी स्वार शिक्षक जागीच ठार.

गडचिरोली: लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकी स्वार शिक्षक जागीच ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In