उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी या नावाने सर्वत्र नावलौकिक आहे. येथील उत्तम उपचारासाठी व्यवस्था असल्याने आपल्या शेजारच्या इतर जिल्हा व कर्नाटक राज्यातील सुध्दा अनेक गोर-गरीब,मजूर,मध्यम वर्गीय रुग्ण मोठ्या प्रमाणात मिरज शहरात सतत उपचारासाठी येतात तसेच उत्तम उपचारानंतर बरे होऊन आपल्या कुटुंबात परत जातात. ह्या मध्ये सर्वात महत्वाचा योगदान हे शासकीय रुग्णालयाचे आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रात सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात ह्याच शासकीय रुग्णालयाचा वाटा होता तसेच रुग्ण बरे करण्याची सरासरी सुध्दा जास्तच होती. रूग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असुन गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, परंतू अद्यापपर्यंत ह्या शासकीय रुग्णालयास आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणतेच विषेश असे नाव देण्यात आले नाही. आणि भविष्यात कोणत्या तरी राजकीय नेत्यांचे नाव देण्यात येईल याची शंका नाकारता येत नाही म्हणून आम्ही आमच्या “सेवक लोकहित मंच” कडुन आपणास विनंती करत आहोत की कोणत्याही राजकीय नेत्यांची नावाची मागणी होण्या आधीच आपल्या कारकिर्दीत या दोन्ही आस्थापनास राजश्री छत्रपती शाहु महाराजांचे नाव देऊन शाहु महाराजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, दूरदृष्टी असलेल्या कार्याचा गौरव सन्मान करावा.
आमच्या या मागणीचे योग्य विचार करुन लवकरात लवकर निर्णय घेऊन मिरज शासकीय रुग्णालय आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयास राजश्री छत्रपती शाहु महाराजांचे नाव देण्यात यावे अन्यथा आम्हास संविधानिक मार्गाने जन आंदोलन उभे करावे लागेल त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा सेवक लोकहित मंचकडुन देण्यात आले त्या वेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी,उपाध्यक्ष प्रशांत कदम,सचिव अनिल मोरे, खजिनदार अनिस मोमीन, संघटक विज्ञान लोंढे सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

