आलापल्ली पोलीस चौकी सामोरील घटना आणखी किती लोकांचे जिव घेणार?
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील आल्लापल्ली येथून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकीस्वार शिक्षक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आल्लापल्ली पोलीस चौकी समोर घडली. ठार झालेल्या शिक्षकाचे नाव वासुदेव कुलमेथे असे असून देवलमरी येथील भगवंतराव शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.अशी माहिती आहे. घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आज दुपारच्या सुमारास कुलमेथे हे आपल्या दुचाकीने नागेपल्ली कडे जात असताना मागून येणाऱ्या अवजड माल वाहून नेणाऱ्या ट्रक ने मागून धडक दिल्याने चाका खाली येऊन चिरडले गेल्याने घटनास्थळी ठार झाले. या अपघातानंतर आलापल्ली पोलीस चौकशी समोर संतप्त लोकांनी या घटने विषयी रोष व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर तणावाची परिस्थिती असून आणखी किती लोंकाचा बळी घेणार पोलीस प्रशासन लगेच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

